Share

मोफत जेवणासाठी 16 तरुणांच्या भावनांशी खेळली तरूणी, केलं असं काही की नेटकरी संतापले

प्रत्येकजण आपल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मौजमजा करतो. आपल्या मौजमजेचा अनुभव आजकालचे तरुण- तरुणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतंच एका महिलेने तिच्या कॉलेजच्या दिवसांतील आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. एका व्हिडिओच्या(Video) माध्यमातून त्या महिलेने आपल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये केलेली मौजमजा सांगितली आहे.(A young woman who played with the emotions of 16 young people for a free meal)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मॅकलॉक ब्रॉक नावाच्या महिलेचा हा व्हिडिओ आहे. मॅकलॉकने तिच्या टिकटॉक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. १६ दिवसांत वेगवेगळ्या मुलांसोबत डेटवर गेल्याचे मॅकलॉकने सांगितले. फक्त जेवणासाठी असे केल्याचे मॅकलॉकने सांगितले आहे.

यावेळी मॅकलॉकने सांगितले की, “जेव्हा मी कॉलेजमध्ये होते. त्यावेळी माझे पैसे संपले होते. तेव्हा मी जेवणासाठी पैसे देखील देऊ शकत नव्हते. त्यावेळी मी डेटिंग अँपची मदत घेतली. मी एका डेटिंग अँपच्या माध्यमातून अनोळखी मुलांना भेटायचे. त्यांच्यासोबत डिनर डेटवर जायचे. मी सलग १६ दिवस वेगवेगळ्या मुलांसोबत डिनर डेटवर गेले होते.”

या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या हुशारीचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी तिच्यावर टीका केली आहे. एका युझरने कंमेंट करत म्हंटले की, “तू खूप हुशार आहेस.” तर दुसऱ्या युझरने कंमेंट करत म्हंटले की, “तू मुलांच्या भावनांशी खेळत होतीस. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करत होतीस.”

या व्हिडिओवर काही महिलांनी देखील कमेंट केली आहे. एका महिलेने कमेंट करत म्हंटले आहे की, “मी मुलांसोबत असे कधीच केले नाही. कारण या गोष्टीला माझ्या दृष्टिकोनातून मुलांचा वापर करणं असे म्हणतात.” या कमेंटवर मॅकलॉक ब्रॉकने प्रत्युत्तर दिले आहे. “त्या सर्व मुलांनी मला स्वतः हून डेटवर नेलं होतं. मी त्यांच्या मागे लागली नव्हती”, असे मॅकलॉक ब्रॉकने सांगितले आहे.

या व्हिडिओला अनेकांनी लाइक देखील केले आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणीने डेटिंग अँपची मदत घेत आपल्या प्रियकराच्या मारेकऱ्याला ठार मारण्याचा कट रचला होता. एका डेटिंग अँपचा उपयोग करत तरुणीने मारेकऱ्याला आमिष दाखवत आपल्या घरी बोलावले. त्यानंतर तरुणीने त्या मारेकऱ्याचा काटा काढला.

महत्वाच्या बातम्या:-
हा गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान हेच समजत नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला
4 दिवसांपूर्वीच शिजला कट; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती आली समोर
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात ‘या’ बड्या शिवसेना नेत्याचा हात? दरेकरांच्या आरोपांनी खळबळ

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now