उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम तरुणाने इस्लामधर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. शाहजहानपूर शहरातील मुस्लिम तरुण गुलनाज उर्फ विराट कुमारने हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. यावेळी गुलनाज(Gulnaaj) उर्फ विराट कुमारने विधिवत पूजा करून हिंदू धर्म स्विकारला आहे. गुलनाजने हनुमान चालिसा पठण देखील केले आहे.(A young Muslim has left Islam and converted to Hinduism)
शाहजहानपूर शहरातील राम जानकी मंदिरात हा घरवापसीचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी राष्ट्रीय गोरक्षक संघाचे स्वामी पद्मनाभ महाराज देखील उपस्थित होते. हिंदू धर्मात घरवापसी केल्यानंतर गुलनाज उर्फ विराट कुमारने ‘जय श्री राम’ आणि ‘हर हर महादेव’ची घोषणा दिली. यावेळी वैष्णव हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गुलनाजच्या गळ्यात हार घातला.
गुलनाज उर्फ विराट कुमार हा रामचंद्र मिशन पोलीस स्टेशन हद्दीतील मिसरीपूर गावचा रहिवासी आहे. हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर गुलनाजने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी गुलनाजने स्वतःच्या इच्छेने इस्लाम सोडून सनातन धर्मात परतल्याचे सांगितले. “आधी आमचे नाव गुलनाज होते. आता आमचे नाव विराट आहे. आमचे पूर्वज सनातनी होते”, असे देखील गुलनाजने सांगितले.
“पूर्वजांबद्दल माहिती मिळाल्यानंतर आम्हाला चांगलं काय आणि वाईट काय ते समजलं. त्यानंतर आम्ही आमच्या मूळ धर्मात परतलो”, असे गुलनाजने सांगितले. यावेळी गुलनाज उर्फ विराट कुमारने त्याच्या कुटुंबाबद्दल देखील माहिती दिली. “माझ्या कुटुंबात आई, बहीण आणि भाऊ आहेत. माझ्या निर्णयामुळे कुटूंबातील कोणालाही पश्चाताप होणार नाही”, असे गुलनाजने सांगितले आहे.
“मी इस्लाममधून सनातन धर्मात परतल्याबद्दल कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी आक्षेप घेतलेला नाही. कोणाला हरकत नाही”, असे देखील गुलनाजने सांगितले आहे. राष्ट्रीय गोरक्षक संघाचे स्वामी पद्मनाभ महाराज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “जे लोक जबरदस्तीने इतर धर्मात गेले होते. ते आत घरवापसी करत आहेत.”
काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील दोन मुस्लिम कुटुंबातील 8 सदस्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. यावेळी बागरा येथील स्वामी यशवीर आश्रम परिषदेचे महंत स्वामी यशवीर महाराज व स्वामी मृगेंद्र महाराज यांनी हवन-पूजा करून त्यांची घरवापसी केली होती. गेल्या काही दिवसांपासून घरवापसीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
सोशल मीडियावरील एका क्लिपमुळे १४ वर्षांपासून बेपत्ता असलेले सुनिल भोई सापडले, कुटूंबाने काढली भव्य मिरवणूक
जितेंद्र आव्हाडांच्या घोषणेवर शिवसेनेमध्ये नाराजी? आदित्य ठाकरेंना फटका बसण्याची शक्यता
१५ वर्षीय रेखाचा ‘या’ अभिनेत्याने जबरदस्तीने घेतला होता किस, रेखाच्या डोळ्यातून आलं होतं पाणी