Pune : पिंपरीतील संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या २१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूमागील कारण उघड झाले असून, तो ऑनलाइन ब्लॅकमेलिंगचा बळी ठरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ऑनलाइन डेटिंग अॅपवरून झालेल्या ओळखीनंतर काही तरुणांनी त्याला जाळ्यात ओढून नग्न फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार पैसे उकळले. अखेर मानसिक तणाव सहन न झाल्याने तरुणाने आपले जीवन संपवले.
अश्लील फोटो काढून ब्लॅकमेलिंग
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, *मृत तरुण बीसीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या मोबाईलवर **एक ऑनलाइन डेटिंग अॅप डाउनलोड केले. याच अॅपच्या माध्यमातून त्याची *पिंपरीतील महेशनगर भागातील काही तरुणांशी ओळख झाली. या तरुणांनी त्याला भेटण्यासाठी बोलावले.
पीडित तरुण महेशनगर येथे पोहोचताच *त्याला आरोपी संदीप रोकडे याच्यासोबत एका खोलीत पाठवण्यात आले. त्याचवेळी इतर आरोपींनी **त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ चोरून काढले. नंतर त्या **फोटो आणि व्हिडिओंच्या आधारे आरोपींनी पीडित तरुणाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. **५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली, त्यापैकी पीडित तरुणाने *३५,५०० रुपये दिले. मात्र, आरोपींची पैशांची मागणी थांबत नव्हती.
ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या
वारंवार होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने *२४ फेब्रुवारी रोजी संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावरून उडी मारली. दुर्दैवाने, खाली पडताच *एका भरधाव कारने त्याला जोरात धडक दिली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
सहा आरोपींवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी *१६ मार्च रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून **प्रणव किशोर शिंदे (२१), नितीन पाटील (२२), संदीप रोकडे (२०), आकाश चौरे (२०) (सर्व रा. महेशनगर, पिंपरी, मूळ रा. धुळे), लोपेश पाटील (२०, मूळ रा. जळगाव) आणि प्रथमेश जाधव (१९, मूळ रा. सातारा) या सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला. यातील *लोपेश पाटील आणि प्रथमेश जाधव यांना अटक करण्यात आली आहे, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
कायदेशीर कारवाई आणि पुढील तपास
या प्रकरणावर पिंपरी पोलिस निरीक्षक अशोक कडलक यांनी सांगितले की, *ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळामुळे तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले. या घटनेने *ऑनलाइन डेटिंग अॅप्सच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. पोलिस पुढील तपास करत असून उर्वरित आरोपी लवकरच गजाआड होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.