Aurangabad : औरंगाबाद येथे अग्निवीर भरतीमध्ये मैदानी चाचणीदरम्यान धावत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. करण नामदेव पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. २१ वर्षीय करण हा कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील रहिवासी होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर भारतीय सैन्य दलाची अग्निवीर भरती सुरू आहे. याठिकाणी करण नामदेव पवार हा सुद्धा सैन्य भरतीसाठी आला होता. रात्रीच्या वेळी मैदानी चाचणी घेण्यात आली. यावेळी करणने मैदानाचे तीन राऊंड पूर्ण केले. मात्र, शेवटचा राऊंड पूर्ण करत असताना त्याला अचानक चक्कर आली व तो खाली पडला.
त्यांनतर त्याला घाटीच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मैदानाचा शेवटचा राऊंड पूर्ण करण्यासाठी केवळ पाच फूट अंतर शिल्लक राहिले होते. परंतु, त्याचवेळी नशिबाने करणचा घात केला.
तसेच बुधवारी संध्याकाळी करणसोबत त्याचा सख्खा भाऊ सागर हादेखील अग्निवीर भरतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दाखल झाला होता. रात्री १२ वाजता मैदानी चाचणी सुरु असताना ही दुःखद घटना घडली. त्यामुळे त्यालाही मोठा धक्का बसला आहे. बेगमपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
करणच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब हादरून गेले आहे. मला पत्नी नाही, त्यामुळे माझा मोठा मुलगाच माझा सहारा होता. तो भरती होऊन घराचा सांभाळ करेल असे वाटत होते, पण आता तोच राहीला नाही. माझा सहारा गेला. माझ्या लहान मुलाला तरी नोकरीत सामावून घ्या, अशी विनंती करणचे वडील नामदेव पवार यांनी केली आहे. या घटनेमुळे करणच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
तसेच करणबरोबर आलेला त्याचा भाऊ सागर यालादेखील दुःख झाले. औरंगाबाद येथे आम्ही दोघेही भरती होण्यासाठी आलो होतो. भाऊ म्हणाला होता की, आपण दोघेही भरती होऊ आणि सोबत देशसेवा करू. पण शेवटच्या राउंडचे काही फूट अंतर शिल्लक असताना माझ्या डोळ्यादेखत माझा मोठा भाऊ गेला. मला आई नाही, वडील आजारी असतात आता मी काय करू, असे मृत तरुणाचा भाऊ सागर याने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
Raju Srivastava: हृदयविकाराच्या झटक्याच्या १५ दिवस आधी राजू श्रीवास्तवची झाली होती ‘अशी’ अवस्था, अभिनेत्याने दिला होता इशारा
Santosh Juvekar : दहीहंडी हा सण आहे तो सणासारखाच साजरा करा, त्याची स्पर्धा करू नका; अभिनेता संतोष जुवेकरने ठणकावले
Raid on lodge in Jalgaon : जळगावात पोलिसांची लॉजवर रेड, आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या १३ मुलींनी केला धक्कादायक दावा..
प्रसिद्ध व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं? वाचा अंगावर काटा उभा राहिलं असा भयानक घटनाक्रम






