Britain : कुठलीही गोष्ट खात असताना ती योग्य प्रकारे खाल्ली नाही तर जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. एका तरुणाला मांसाच्या एका तुकड्यामुळे त्याचा मौल्यवान जीव गमवावा लागला आहे.
ब्रिटनमधील हॅलेवूडमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. मार्टिन पीटर वेअर नावाचा एक २६ वर्षीय तरुण हेलबँकच्या मर्सी व्ह्यू पब्लिक हाऊसमध्ये जेवणासाठी गेला होता. तो मांस खात असताना मांसाचा एक तुकडा त्याच्या घशात अडकला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
त्यांनतर तातडीने त्याला विस्टन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, पुष्कळ प्रयत्न करूनही डॉक्टरांना त्याचे प्राण वाचवता आले नाही. एका मांसाचा तुकड्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले.
या घटनेच्या तपासाकरिता एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या माहितीनुसार, मार्टिनला एक समस्या होती. यामुळे त्याला अन्न गिळायला त्रास होत होता. घशात अडकल्यामुळे त्याचा श्वास थांबला व त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
अहवालानुसार, ही घटना १० एप्रिल २०२२ रोजी घडली होती. परंतु, आता १५ ऑगस्टला सेफ्टन कोरोनर कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी तपास समितीने याबाबतची माहिती दिली आहे.
थायलंडमध्ये जून महिन्यात अशाच प्रकारे एका तरुणीचा मृत्यू झाला होता. २७ वर्षीय अरिसारा करब्देचो ही इंटरनेट सेन्सेशन होती. मार्चमध्ये एलिस म्हणून ओळखल्या जाणार्या लोकप्रिय कॉस्प्लेअर अरिसाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी घशात अन्न अडकल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, तिच्या आईने सांगितले की, अरिसारा पारंपारिक थाई फूड, पोर्क कबाब आणि चिकट भात खाण्याचा सराव करत होती. एकदा तिने हे पदार्थ खाऊन पाहिले. मात्र, कबाबमधील मांसाचा तुकडा तिच्या घशात अडकला. तिला श्वास घेणे कठीण झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की मुलीला रुग्णालयात आणण्यासाठी नऊ मिनिटे उशीर झाला, ज्यामुळे तिच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला.
महत्वाच्या बातम्या
(Monsoon sessions)दरवाजे अद्यापही खुले आहेत पण..; बंडखोर आमदारांसमोर आदित्य ठाकरेंनी ठेवली ‘ही’ अट
विनायक मेटेंच्या पत्नीला राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी द्यावी; राष्ट्रवादीची मागणी
Bollywood: आता बाॅलीवूडवरही ईडीची काडी; अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस २०० कोटींच्या घोटाळ्यात आरोपी
भाजपला शिंदे गटाची गरज नाही?, प्लॅन बी वर काम सुरू; राजकीय वर्तूळात खळबळ