शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ! एटीएममध्ये चोरी करणाऱ्या चोराला महिलेने शिकवला चांगलाच धडा

वसई | आपल्या आजूबाजूच्या परिसरात चोरीच्या घटना घडतात. चोर वेगवेगळ्या पध्दतीने चोऱ्या करत असतात. अनेकदा चोरं लोकांना गंभीर दुखापती करत असतात. तर काही जण आपल्या ताकदीपेक्षा डोक्याने विचार करून चोरांना पकडतात. वसईमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका रणरागिनीने एटीएममध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला युक्तीचा वापर करून धाडसाने पकडले आहे.

वसईमध्ये फादरवाडी परिसरात सुलभा पवार आपल्या कुटूंबासह राहतात. त्यांच्या घराशेजारीच एक बॅंक आणि एटीएम आहे. एटीएममध्ये एक चोर घूसला होता. मशीन फोडून पैसे  काढून पोबारा करण्याचा त्याचा प्लॅन होता.

सुलभा पवार यांनी पाहिलं की, एक तरूण एटीएममध्ये घूसला आहे. तो मशीनमधून पैसे चोरण्याचा प्रयत्न करत आहे. पवार यांनी त्या चोराला पकडायचं असं ठरवलं. त्यांनी धाडस करून गूपचूपपणे एटीएमचं शटर ओढून घेतलं आणि त्याला टाळं लावलं.

एटीएमचं शटर बंद केल्यानंतर सुलभा पवार यांनी आजूबाजूच्या नागरिकांना एटीएममध्ये चोर शिरला असल्याचं सांगितलं. लोक जमा झाल्यानंतर तात्काळ त्यांनी पोलिसांना फोन करून घटनेबद्दल माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी येऊन चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान चोराला अगदी शिताफीने पकडून देणाऱ्या सुलभा पवार यांचे अनेकांनी कौतूक केलं आहे. शक्तीपेक्षा युक्ती वापरून आपण आलेल्या संकटांवर मात करू शकतो हे पवार यांच्यामुळे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांचा नादच नाय! पुण्याचा हा चार वर्षांचा चिमुकला महिन्याला कमावतो दिड लाख रूपये
जाणून घ्या आज काय करतात अभिनेते विनोद मेहराची मुलं?
गावठी मुलाच्या डान्सने वेड लावले जान्हवी कपूरला, फिदा होत म्हणाली माझ्यासोबत एक दिवस घालवशील का?

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.