सध्याच्या काळात अनेक पर्यटक जंगलात भटकंती करण्यासाठी जात असतात. पण काही वेळा पर्यटकांना स्वतःच्या बेजबादारपणाचा मोठा तोटा सहन करावा लागतो. काही वेळा पर्यटक जंगलामध्ये कुठेही आणि केव्हाही गाडीतून उतरतात. यावेळी जंगलामधील प्राण्यांकडून पर्यटकांवर(Tourist) हल्ला होण्याची देखील शक्यता असते.(A woman standing in the street was rescued by a tiger, but watch the horrible video)
असाच काहीसा प्रकार एका जंगलामध्ये घडला आहे. जंगलाच्या मधोमध बनवलेल्या रस्त्यावर एक महिला अचानक गाडीतून उतरते. त्यावेळी जंगलामधील वाघ त्या महिलेवर हल्ला करतो आणि त्या महिलेला फरफटत जंगलात घेऊन जातो. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.
या व्हिडिओमध्ये एक महिला जंगलाच्या मध्ये असलेल्या रस्त्यावर गाडी थांबवते. त्यानंतर ती महिला गाडीतून उतरते आणि आपल्या सहकाऱ्यासोबत बोलू लागते. त्यावेळी एक वाघ जंगलातून येतो आणि त्या महिलेवर हल्ला करतो. वाघ त्या महिलेला फरफटत जंगलात घेऊन जातो. त्यावेळी महिलेसोबत असलेला सहकारी तिला वाचविण्यासाठी पुढे येतो.
सहकारी त्या महिलेला वाचविण्यासाठी वाघाच्या मागे जंगलात जातो. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. हा व्हिडिओ जंगलाचा नसून वन्यजीव सफारीचा असल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे.
https://twitter.com/RANDOMFACTS2022/status/1542914078573748226?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1542914078573748226%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Ftiger-attack-woman-standing-outside-car-in-wildlife-video-viral-in-china-mhkd-725981.html
एका विदेशी वेबसाइटच्या अहवालामध्ये ही घटना घटना कव्हर करण्यात आली होती. वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला हा व्हिडिओ २०१६ मधील आहे. हा व्हिडिओ बीजिंग येथील एका राष्ट्रीय उद्यानातील आहे. ज्या महिलेवर वाघाने हल्ला केला होता, त्या महिलेचे वय ३० असल्याची माहिती वेबसाइटने दिली आहे.
वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, वाघाने केलेल्या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली होती. या हल्ल्यात त्या महिलेचे प्राण वाचले. सहकाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्या महिलेचा जीव वाचला. रँडम फॅक्ट्स नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अंकांनी हा व्हिडिओ रिट्विट देखील केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेला आणखी एक धक्का! तब्बल १२ खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत
महाराष्ट्राताली अमरावतीत उदयपुरसारखे भयावह हत्याकांड? शहांनी थेट NIA ला चौकशीसाठी पाठवले
एकनाथ शिंदेंना जबर धक्का? ‘त्या’ व्हायरल पत्रामुळे संभ्रम वाढला; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा