Uttar Pradesh : एका महिलेने माहेरच्या लोकांनी हुंड्यात दिलेल्या म्हशीचा योग्य वापर करून प्रचंड यश मिळवल्याची घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. या महिलेने योग्य शक्कल लढवत आपल्या हुशारीच्या जोरावर अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. तिच्या कर्तुत्वाने तिने सर्वांची मान उंचावली आहे. काय आहे नेमकी तिची गोष्ट? वाचा घ्या या लेखात.
उत्तरप्रदेशातील निगोहा येथील मीरकनगर गावातील रहिवासी बिटानी देवी असे या महिलेचे नाव आहे. बिटानी देवी या पाचवी पास आहेत. त्यांना ३७ वर्षांपूर्वी लग्नात हुंडा म्हणून एक म्हैस मिळाली होती. त्यावेळी १९८५ मध्ये त्यांनी एक स्वतःची दूध डेअरी काढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुबीयांनीही पाठिंबा दिला.
त्यांनतर त्यांनी स्वतःच्या जोरावर दूध डेअरी काढली. बिटानी देवी यांनी घेतलेल्या मेहनतीला आज यश आले आहे. आज त्यांचा व्यवसाय अशा टप्प्यावर येऊन पोहोचला आहे की, जवळपास १२ महिलांना त्या रोजगार देत आहेत.
बिटानी देवी यांच्याकडे सध्या १६ गायी आणि १२ म्हशी आहेत. त्या दिवसाला जवळपास १०० ते १२० लिटर दूध देतात. या गुरांना चारा देण्यापासून ते दूध काढण्यापर्यंतची सगळी कामं बिटानी देवी एकट्या करतात. त्यांच्या या मेहनतीला आता यश आले आहे.
बिटानी देवी यांचे पती हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते आता बिटानी देवी यांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देतात, असे त्या सांगतात. बिटानी देवी या एका कंपनीला दूध विकतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्याशी आजूबाजूच्या अनेक महिला व पुरुष जोडले गेले आहेत.
बिटानी देवी यांच्या या मेहनतीमुळेच त्यांना २००५ पासून सलग सर्वाधिक दूध उत्पादनासाठी गोकुळ पुरस्कार मिळत आहे. त्या अनेकदा प्रदेश स्तरावर मिळणाऱ्या पुरस्कारांमध्ये टॉप ५ मध्ये असतात. आता अनेक ठिकाणी बिटानी देवी यांच्या हुशारीचे कौतुक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
Nayantara : आई होऊन काही दिवसच झाले की नयनतारावर आलं मोठं संकट, कोसळला दुखाचा डोंगर
Anusha Dandekar : काय सांगता? लग्नाआधीच आई झाली ‘ही’ मराठी अभिनेत्री, बापाचे नाव ऐकून धक्का बसेल
रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट ‘एवढ्या’ रुपयांनी महागले, सणासुदीला नागरिकांना रेल्वेचा धक्का