Gulabrao Patil : संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यावेळी सगळ्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. परंतु, ध्वजारोहणाच्या वेळी जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
जळगावमध्ये राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असताना एका महिलेने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वंदना सुनील पाटील असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी या महिलेच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केली असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून महिला व तिच्या पतीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु होते. परंतु अजूनपर्यंत प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे या महिलेने हे कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची या महिलेची व तिच्या पतीची मागणी आहे. यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते. मात्र, त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही.
त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असताना या महिलेने स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच या महिलेला थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
महत्वाच्या बातम्या
Aamir Khan: लालसिंग चड्ढाने वीकेंडला पकडला वेग, तरीही ५० कोटींपासून फारच लांब, वाचा आतापर्यंतची कमाई
Aamir Khan: ‘या’ ४ अभिनेत्रींनी दिला होता आमिर खानसोबत काम करण्यास नकार, वाचून आश्चर्य वाटेल
Dhar: मोठी बातमी! धरण फुटल्याने २ गावे गेली पाण्याखाली, बचावकार्यासाठी २०० जवान रवाना
Abdul sattar : रस्त्यावरील खड्ड्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यु, ध्वजारोहन झाल्यानंतर शिवसैनिकांनी सत्तारांना अडवलं