शाब्बास रे पठ्ठ्या! भारतीय तरूणाने जवानांसाठी तयार केला अनोखा बुट; दुश्मनांना घालता येतील गोळ्या

सैनिकांना सीमेवर लढताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपन प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाराणसीच्या एका तरूणाने सैनिकांसाठी असा बुट तयार केला आहे की त्या बुटाद्वारे सैनिकांना परिसरातील घुसखोरांची माहिती मिळु शकते त्याचबरोबर ते या बुटाच्या साहाय्याने दुश्मनांवर गोळ्याही चालवु शकतात.

 

श्याम चौरसिया असं हायटेक बुट बनवणाऱ्या तरूणाचे नाव आहे. याआधीही त्यांनी जवानांच्या सुरक्षेसाठी अनेक साधने बनवली आहेत. चला तर मग जाणून घेऊया या बुटाबद्दल

 

बुटात सेंसर बसवण्यात आले आहे

 

या सेंसरमध्ये अलार्म लावण्यात आला आहे. २० किलोमीटर परिसरात शत्रु घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर अलार्म वाजून जवानांना सतर्क करेल.

 

बुटाच्या साहाय्याने गोळ्या चालवू शकता

 

यामध्ये गन लावण्यात आली आहे. त्याच्या साहाय्याने समोर आणि मागे दोन्ही बाजूने शत्रुंवर गोळ्या मारता येतील. यासाठी रिमोट देण्यात आलेला आहे.

 

पायांना मिळेल थंडीत ऊब

 

यामध्ये एक हिटर लावण्यात आले आहे. जे गरम होऊन सैनिकांच्या पायांना थंडीच्या दिवसात ऊब मिळेल. यात स्टीलची चादर, सोलर प्लेट, इलेक्ट्रॉनिक बटन बसवण्यात आलेले आहे.

 

श्याम चौरसिया यांनी जवानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा बुट बनवला आहे. त्याचे वजन ६५० ग्रॅम असुन रबर आणि स्टील वापरून बनवण्यात आले आहे.

महत्तवाच्या बातम्या-

लॉटरी विक्रेत्यालाच बारा कोटींचा जॅकपॉट, ‘त्या’ न विकलेल्या तिकीटामुळे उघडले नशीब

‘त्या’ लोकांनी माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले तेव्हाच मी ठरवले की…; भरत जाधव झाला भावूक

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.