उत्तर प्रदेशमधील(Uttar Pradesh) हरदोईमध्ये एक अनोखं बाळ जन्माला आलं आहे. या मुलाला चार हात आणि चार पाय आहेत. हे नवजात बाळ निरोगी आहे. लोक याला ‘निसर्गाचा चमत्कार’ म्हणत आहेत. त्याचवेळी काही जणांनी या मुलाची तुलना देवाच्या पुनर्जन्माशी केली आहे. या घटनेची सध्या आसपासच्या परिसरात जोरदार चर्चा होत आहे.(A unique baby was born in this village; The villagers said, ‘This is the incarnation of God’)
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जुळ्या बाळांच्या जन्माच्या केसशी संबंधित आहे. दुसऱ्या बाळाचा विकास योग्यरित्या होऊ शकला नाही. त्यामुळे या बाळाला एका मुलाचे हात आणि पाय अतिरिक्त होते. या बाळाच्या जन्मानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या आठवड्यात या बाळाचा जन्म झाला आहे.
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील शाहबाद सामुदायिक आरोग्य केंद्रात या बाळाचा जन्म झाला आहे. जन्माच्यावेळी या बालकांचे वजन सुमारे तीन किलो होते. मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी मुलाची आई करीनाला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. त्यामुळे करीनाला शाहबाद येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते.
त्यानंतर करीनाने या बाळाला जन्म दिला. या बाळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आसपासच्या परिसरातील लोक त्याला पाहण्यासाठी रुग्णालयात आले होते. शाहबाद सीएचसी केंद्रातील स्टाफ नर्स रीमा देवी वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
बाळाला उपचारासाठी सुरवातीला हरदोई या ठिकाणी नेण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी बाळाला लखनऊला नेण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश बाबू यांनी सांगितले की, ” ही जुळी मुले असून दुसऱ्या बाळाचा विकास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे बाळाला हात आणि पाय अतिरिक्त आले आहेत.
अशीच एक घटना बिहारच्या गोपालगंजमध्ये देखील घडली होती. त्या ठिकाणी तीन हात आणि तीन पाय असलेल्या एका मुलाचा जन्म झाला होता. रेवतीथ येथील रहिवासी मोहम्मद रहीम अली आणि पत्नी रबिना खातून यांना एक मुलगा झाला होता. या मुलाला तीन हात आणि तीन पाय होते. बैकुंठपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात या मुलाचा जन्म झाला होता.
महत्वाच्या बातम्या :-
‘मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत’; महिला शिवसैनिकांचा बंडखोर आमदारांना इशारा
..कारण त्यावेळी आपण खूप दमलेलो असतो, लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल भलतंच बोलून गेली आलिया
घरगुती सिलेंडरचा भडका! तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी वाढवल्या किंमती, सामान्यांच्या खिशावर ताण