महाराष्ट्र पुन्हा हादरला! दोन वर्षाच्या कोवळ्या बालकावर नराधमाने केले अत्या.चार

चंद्रपुर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शेतमजुर म्हणून काम करणाऱ्या तरूणाने आपल्या मालकाच्या २ वर्षाच्या मुलीवर अत्या.चार केला आहे. त्याने तिला दुचाकीवरून चक्कर मारून आणतो असा बहाणा करून दुचाकीवर घेऊन गेला आणि हे घाणेरडे कृत्य केले. या घटनेनंतर गावात नागरिकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे.

 

चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती हा अतिदुर्गम असलेला तालुका आहे. याच तालुक्यातील शेणगाव या छोट्याशा गावात ही विकृतीचा कळस गाठणारी घटना घडली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील आकाश पवार नावाचा २१ वर्षीय तरूण शेतात मजुरी काम करतो. त्याने आपल्या मालकाच्या २ वर्षाच्या मुलीला दुचाकीवर बसवुन घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून घरी आणून सोडले. त्यानंतर चिमुरडीला रक्तश्राव सुरू झाला. मुलीच्या कुटुंबाला शंका आल्याने त्यांनी जिल्हा रूग्णाल्यात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्यावर अत्या.चार झाल्याचे समोर आले.

 

याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीच्या शोधासाठी पथकं तैनात केली. तेलंगणा राज्यात पळुन जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी आकाश पवारला याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

सध्या मुलीची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
हाताने चाचपणे, चाळे करणे लैंगिक अत्याचारात मोडत नाही; हायकोर्टाचा वादग्रस्त निर्णय
अकोल्याच्या ‘या’ अडीच वर्षाच्या मुलीची स्मरणशक्ती बघून वेड लागेल; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालीये नोंद
लस घेण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी करावे लागणार लिंक; वाचा सरकारचे आदेश 
“कार्यक्रमाला बोलावता व अपमान करता, शोभत नाही तुम्हाला हे”; ममतांनी मोदींना तोंडावर सुनावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.