सचिन वाझेंनंतर ठाण्यातील बड्या नेत्याची होणार चौकशी? राजकीय वर्तूळात उडाली खळबळ

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. काल रात्री रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली.

दरम्यान, वाझेंनंतर आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याचबरोबर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा आरोप केला होता. यामुळे आता ठाण्यातून आणखी काही जणांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अटकेपूर्वी तब्बल ११ तास वाझेंची चौकशी..
सचिन वाझे काल सकाळी ११ वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास १३ तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. आज सकाळी त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं. अखेर कोर्टानं त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

इशान किशनने पदार्पणातच इंग्लीश बॉलर्सच्या उडवल्या चिंधड्या; ३२ चेंडूत ५६ धावांची तुफानी खेळी

सचिन वाझेंना पाठींबा देत कंगणा म्हणतीय ‘हे तर शिवसेनेचे कारस्थान’

मी CA होणारच..! दारात वडिलांचा मृतदेह असताना दिली परीक्षा, कुटुंबासाठी मंगलचा मोठा संघर्ष

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.