Russia : मागील दिवसांत घडलेल्या काही घटनांमुळे भारतावर हल्ला होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यामुळे सगळीकडे प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसही सतर्क झाले.
मात्र, आता देशातील हे संकट टळले असल्याचे समोर आले आहे. भारतावर हल्ला करणार असलेल्या एका अतिरेक्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.
रशियाच्या अधिकाऱ्यांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा सदस्य ताब्यात घेतला आहे. भारतावर एक मोठा आत्मघातकी हल्ला होणार असल्याची माहिती रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने दिली आहे. एका दहशतवाद्याला रशियाने ताब्यात घेतले आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या सदस्याने ही कबुली दिली आहे.
काही दिवसाअगोदर रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर एक संशयित बोट आढळून आली होती. या बोटीमध्ये तीन एके-४७ आणि काडतुसं सापडली होती. त्यामुळे राज्यात अलर्टदेखील जारी करण्यात आला होता.
त्यानंतर मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोलच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एक धमकीचा मेसेज आला. यामध्ये २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. तसेच भारतातील काही लोक हे काम पूर्ण करणार असल्याचेही या मेसेजमध्ये सांगण्यात आले.
मेसेज आलेला नंबर हा पाकिस्तानचा असल्याचे कळले आहे. तसेच पोलीस यंत्रणा या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. आधी धमकीचा मेसेज व त्यांनतर दहशतवाद्याने स्वतः दिलेली हल्ल्याची कबुली यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : टीका करणाऱ्यांना राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर, म्हणाले, माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व..
उदय सामंतासह ‘या’ बड्या नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये
Raj Thackeray : …अजूनपर्यंत याच्यासारख्या दळिद्री कुणी झाला नाही; राज ठाकरे इतके का भडकले? वाचा…
वसंत मोरेंना पाहताच राज ठाकरेंनी कार थांबवली अन्…; वाचा नेमकं काय घडलं?