‘कदाचित ही शेवटची शुभसकाळ’; कोरोनाने मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळ्यातून पाणी आणणारी पोस्ट 

मुंबई | गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. उपचाराअभावी रूग्णांना प्राण गमावावे लागत आहेत. देशात ऑक्सिजन, बेड, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यातील सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक निर्बंध लावत आहेत.

कोरोना काळात पोलिस कर्मचारी, डॉक्टर यांनी जीवाची बाजी लावत रूग्णांचे प्राण वाचवले आहेत. मात्र lतरीही  रुग्णांना आपले जीव गमवावे लागले आहेत. कोरोनाने तरूणांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांना ग्रासले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर भयंकर रूप धारण केले आहे.

मुंबईच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टर मनीषा जाधव यांनी कोरोना काळात रुग्णांची सेवा केली होती. मात्र कोरोनाची त्यांना लागण झाली आणि त्यातच त्यांना  जीव गमवावा लागला आहे. मनीषा जाधव या ५१ वर्षाच्या होत्या.

मनीषा जाधव यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यामूळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सूरू होते. मात्र  दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. अखेर त्यांना मृत्यूने गाठलंच आणि उपचार सुरू असतानाचं सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

वैद्यकीय अधिकारी मनिषा जाधव यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक फेसबूक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, कदाचित ही माझी शेवटची गुड मॉर्निंग असू शकेल. इथून पुढे या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला भेटू शकणार नाही. सर्वांनी काळजी घ्या. शरीर मरते. आत्मा नाही. आत्मा अमर आहे. असं भावूक होत जाधव यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपुर्वी कल्याणमधील डॉक्टर पितापुत्राने कोरोनामुळे जीव गमावला होता. त्यांनीही कोरोना काळात गोरगरीबांची मोठी मदत केली होती. आता डॉक्टर मनीषा जाधव यांचाही मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार भारतात गेल्या २४ तासांमध्ये १,७१६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात १ लाख ८० हजार ५३० रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. सध्या २० लाख ३१ हजार ९७७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘कुछ तो गडबड है’ म्हणत गाजवला छोटा पडदा, वाचा बँकेतला एक रोखपाल कसा बनला कलाकार
“लोकसंख्या वाढत असल्यामुळे लोक मरताय, तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात टाका”
ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून आव्हाडांच्या पत्नी संतापल्या; राष्ट्रवादीच्या मदतीला मनसे धावली
मी देशासाठी मरतोय, पण माझ्या पत्नीला उपचार मिळेनात; BSF जवान ढसाढसा रडला

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.