आयुष्याने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले, पण नंतर एका शिक्षकाने तिचे आयुष्य उभारले

नागपुर | प्रेमासाठी वाटेल ते करण्यास प्रेमीयुगल तयार असतात. घरच्यांची लग्नासाठी परवानगी नसेल तर घरातून पळून जाण्याच्या घटना असतात. वर्ध्यातील एका मुलीनेही जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकरासाठी आईवडिलांना सोडून घरातून धूम ठोकली. मात्र तिच्या नशीबात काहीतरी वेगळचं लिहलं होतं.

प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी ती घरातून पळून गेली. त्यानंतर एका मंदिरात जाऊन दोघांनी विवाह केला. पण लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पोलिसांनी नवऱ्याला अटक केली. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशीच संसार मोडल्याने ती पुर्णपणे खचून गेली होती.

जन्मदात्या आईवडिलांकडे परत जावे तर ते सांभाळ करतील का नाही? हा प्रश्न समोर होता. पोट भरण्यासाठी नागपुरच्या रेडलाईट एरियामध्ये तिला वेश्या म्हणून काम करावे लागले. रोज कुणीतरी येऊन शरीराचे लचके तोडू लागले. आयुष्याची पुर्ण राखरांगोळी झाली होती.

आयुष्यात अनेक संकटं समोर दिसत होती. त्यानंतर नागपुरातील एका व्यक्तीने तिला आधार दिला. तिच्याशी गोड बालून शारिरिक संबंध प्रस्थापित करून एका मुलाला जन्म दिला. त्याने मुलाच्या जन्मानंतर मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळून तरूणीने खुप दुर निघून जायचं ठरवलं.

आपल्या जगण्यात आता काही अर्थ उरला नाही. त्यामुळे जीव देऊन यातून सुटका मिळवायची असं तिने ठरवलं. पण जीव देण्यासाठी जात असताना तरूणीच्या आयुष्यात असा एक व्यक्ती आला आणि त्याने जगण्याची नवी दिशा दाखवली.

पेशाने शिक्षक असलेल्या एका तरूणाची भेट झाली. दोघांचे आयुष्य दु:खाने भरलेलं होतं. दोघांनीही आपल्या आयुष्यातील अडचणी एकमेकांना सांगितल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर दोघांना आयुष्यभरासाठी खऱ्या जोडीदाराची साथ मिळाली.

गेल्या दहा वर्षांपासून दोघेही सुखात संसार करत आहेत. तरूणीच्या मुलाचाही संभाळ शिक्षक पती करत आहे. त्याने मुलाला चांगल्या शाळेत घालून पालनपोशनाची जबाबदारी स्वीकारली आहे. मुलगा आता बारा वर्षांचा झाला आहे.

आयुष्य जगत असताना अनेक संकट आली. पोटाची भूक भागवण्यासाठी वेश्या म्हणून काम करावे लागले. तिने जगण्याची उम्मीद सोडून दिली होती. पण एका शिक्षकामुळे तिच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सोनम कपूरच्या छोट्या बहीणीने शेअर केले बिकनीतील फोटो; सोशल मिडीयावर रंगली चर्चा
‘हम है नये अंदाज क्यों हो पुराना’ गाण्यावर पाठक बाईंचा धमाकेरदार डान्स; व्हिडीओ पाहून तुमचेही पाय थिरकतील
दाभोळकर आणि पानसरेंच्या प्रकरणावरून हायकोर्टाने तपास यंत्रणांना खडसावले, म्हणाले…
साध्या डान्सरच्या प्रेमात वेडी झाली जान्हवी कपूर, दोघांच्या डेटचा लाइव्ह व्हिडीओ व्हायरल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.