Share

Club cricket match: एक ओपनर झिरोवर नाबाद तर दुसऱ्याने झळकावले शतक, क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला विचित्र प्रकार

Club Cricket Match,

(Club cricket match): इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या एका क्लब क्रिकेट सामन्यात सलामीवीर फलंदाजाने असा पराक्रम केला ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. हा क्लब क्रिकेट सामना हॉर्शम आणि हॉर्ले सरे यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हॉर्शमचा सलामीवीर फलंदाज जो विलिसने अशी खेळी केली, जी पाहून सगळेच थक्क झाले.(Alfred Haynes, Club Cricket Match, Horsham, Horley Surrey, Willis)

जो विलिसने अवघ्या ४४ चेंडूत १०३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ९ षटकार मारले. त्याचवेळी विलिससोबत सलामीला आलेल्या आल्फ्रेड हेन्सला दुसऱ्या टोकाला आपले खातेही उघडता आले नाही आणि त्याच्या सहकारी फलंदाजाने शतक झळकावले. आल्फ्रेड हेन्स दुसऱ्या टोकाला विलिसची फलंदाजी पाहत राहिला.

विलिसने शतक ठोकेपर्यंत त्याला एकही धाव करता आली नाही. यादरम्यान दोघांमध्ये ११० धावांची भागीदारी झाली, ज्यामध्ये १०३ धावा फक्त विलिसच्या बॅटमधून आल्या. या सामन्यात आल्फ्रेड हेन्स ९ धावा काढून बाद झाला. यादरम्यान त्याने २४ चेंडूंचा सामना केला ज्यामध्ये फक्त एक चौकार होता.

या सामन्यात हॉर्ले सरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यादरम्यान संपूर्ण संघ ३६ षटकांत १५७ धावा करून ऑलआऊट झाला. दुसरीकडे, हॉर्शमच्या संघाला सामना जिंकण्यासाठी १५८ धावांचे लक्ष्य मिळाले. हॉर्शमच्या बाजूने सलामीला गेलेला विलिस क्रीझवर येताच सरेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. विलिसच्या फलंदाजीदरम्यान त्याचा विलिसचा स्ट्राईक रेट २३४ होता.

यादरम्यान विलिसने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. विलिसच्या खेळीच्या जोरावर संघाने सामना ७ विकेटने जिंकला. विलिस या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांमध्ये ६८ च्या सरासरीने ६८९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर दोन शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या
भाजपने शिवसेना फोडताच ठाकरेंनी कॉंग्रेस फोडली; कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश
क्रिकेटमधून ब्रेक मिळताच अनुष्काला घेऊन पॅरिसमध्ये पोहोचला विराट, पण आहे ही अडचण
कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार; बड्या नेत्याने सांगितली आतली खबर

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now