सरपंचपदाच्या शपथविधीसाठी हेलिकॉप्टरमधून धडाकेबाज एन्ट्री; पाहा व्हिडिओ

अहमदनगर | सनई चौघडे, ढोल ताशा, भगवे फेटे आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद तो म्हणजे गावात हेलिकॉप्टर येणार. पण हेलिकॉप्टरमधून कुठला मंत्री, नेता येणार नसून चक्क गावचा सरपंच मोठ्या थाटात येणार असल्याने हे दृश्य पाहण्यासाठी गावातीलचं नव्हे तर गावाशेजारील मंडळींनी हजेरी लावली होती.

एखाद्या मंत्र्याच्या शपथविधी सोहळ्यालाही लाजवेल असा शपथविधी सोहळा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालूक्यातील आंबी दुमला गावात पाहायला मिळाला. सरपंचाचे हेलिकॉप्टरने थाटात आगमन होताच बारा बैलजोडीच्या बैलगाडीत त्यांची संपुर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली.

गावातील तरूण जालींदर गागरे कामानिमित्त पुण्यात आले आणि तिथेच स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी कंपन्या उभ्या केल्या. पण त्यांचे गावाबरोबर संबंध तुटले नव्हते. गावातील अनेक सामाजिक कार्यांमध्ये ते पुढाकार घेत. गावातील तरूणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिले होते.

गावाच्या विकासासाठी त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत उभं राहायचं ठरवलं आणि गावातील लोकांनीही त्यांना साथ देत विजयी केलं. गावचे सरपंचपदही सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने त्यांच्याचं गळ्यात सरपंच पदाची माळ पडली.

गावचा सर्वांगीण विकास हेच ध्येय

मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडतो तसाच आंबी दुमला गावात सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत शपथ घेतली. गावचा विकास आणि गावाकडे चला हा नारा डोळ्यासमोर ठेवून मी गावात आलो असल्याचं सरपंच जालिंदर गागरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
बाबो! मानसी नाईकने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; सोशल मिडीयावर घालतोय तुफान धुमाकूळ
‘पंतप्रधानांनी आत्मचिंतन करावं’; नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
१२ आणि ३३० रूपये भरून मिळवा दोन लाख; मोदी सरकारची गरिबांसाठी विमा योजना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.