देवमाणूस! बाळ सारखं रडत होतं, बाळाला शांत करण्यासाठी डॉक्टरने गायलं गाणं; पाहा व्हिडिओ

धुळे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजला आहे. कोरोनाची लाट आल्यापासून आरोग्य कर्माचारी, डॉक्टर, नर्स रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत आहेत. या योध्द्यांचे संपुर्ण देशभरात कौतूक होत आहे.

रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत असतात. डॉक्टर आपल्या कुटूंबातील सदस्याप्रमाणे रुग्णांची काळजी घेत असतात. काही दिवसांपुर्वी एका वृध्द महिलेचे केस डॉक्टर विंचरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर कोलकत्यातील एक  डॉक्टर रुग्णांचे डोळ्यासमोर जीव जात असल्याचं  पाहून ढसा ढसा रडला होता.

डॉक्टर म्हणजे देवच आहे असं अनेकजण म्हणत असतात. डॉक्टरांच्या मनात किती प्रेम असतं याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. धुळे शहरातील निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिटमधील डॉ. अभिनय दरावडे यांनी  एका नवजात बाळाला छान गाणं गाऊन झोपी घातलं आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता, डॉ दरावडे नवजात बाळाला हातात घेऊन त्या बाळाकडे पाहत आहेत. आई आपल्या बाळाला जसं अंगाई गीत गाऊन झोपी घालते. तसचं गाणं डॉक्टरांनी गायलं आहे. इस मोड से जाते है.. कुछ सुस्त कदम रास्ते… कुछ तेज कदम राहे हे गाणं डॉ. दरावडे गात आहेत.

 

व्हिडिओ शेअर करत डॉ दरावडे यांनी एक पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये म्हटलं की, आमच्या NICU मधल्या ९०० ग्रॅम वजनाच्या या चिमुकल्याला झोप येत  नव्हती! कालपासून त्याचा ऑक्सिजन निघालाय, दुध प्यायला लागलाय तशी ताकद आलीय त्याला!

मग काय रात्री रडायला सुरूवात! NICU मधल्या आजूबाजूच्या दुसऱ्या पिटुकल्या बाळांना त्रास होईल. इतक्या जोरात साहेबांनी रडायला सुरूवात केली! रडणं काही थांबेना! मग त्याला जरा बाहेर आणलं (केबिनमध्ये) आणि गाणं म्हटलं.

तसं ते गाणं ऐकू लागलं, आणि नंतर दोन तीन गाणी म्हटल्यावर झोपी गेलं! इवलंसं आहे पण स्वत:ला काय हवं ते बरोबर मिळवून घेतलं पठ्ठ्याने! अशी पोस्ट डॉक्टरांनी लिहिली आहे. डॉक्टरांच्या मनात किती आपुलकी प्रेम असते हे  पुन्हा एकदा समोर आलं आहे.

नवजात बाळाची डॉक्टरांकडून काळजी घेतली जाते. बाळचा जन्म झाल्यानंतर बाळाचे वजन कमी असेल तर त्याला काचेत ठेवले जाते. यामध्ये बाळाची नर्स, डॉक्टर विशेष काळजी घेत असतात. बाळीची प्रकृती सुधारल्यानंतर बाळाला आईकडे दिलं जातं.

दरम्यान सोशल मिडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.  डॉ दरावडे यांचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. डॉक्टर तुमचा आवाज छान आहे. तुम्ही चांगलं काम करत आहात. असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
१५ दिवसाला नवं लग्न, सोनूची १३ लग्न अन् १३ मुलांना लुटलं; अखेर लुटेरी सोनू शिंदे सापडलीच
महागड्या गाड्यांपासून ते अरबी समुद्राच्या शेजारी शानदार बंगला, वाचा रतन टाटांची लाईफस्टाईल
वाह गं सुगरण! चक्क प्रेशर कुकरमध्ये चपात्या करतेय महिला, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.