पतीने नसबंदी केल्यानंतरही पत्नी गर्भवती; डॉक्टरांच्या तपासणीत धक्कादायक कारण आलं समोर

राजस्थान | कूटूंब नियोजनसाठी नसबंदी केली जाते. मात्र पतीने नसबंदी केल्यानंतरीही पत्नी गर्भवती होण्याचे प्रकार समोर येत आहेत. राजस्थानमधील अजमेर येथीलही एका तरूणाने नसबंदी केल्यानंतर त्याची पत्नी  गर्भवती राहिली आहे.

नसबंदी केल्यानंतर पत्नी गर्भवती होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र डोक्यात संशयाचं भूत निर्माण झालेल्या तरूणाने पत्नी गर्भवती कशी झाली यावरून तिला त्रास देण्यास सुरूवात केली.

पतीने ४ महिन्यापुर्वी नसबंदीची शस्त्रक्रिया केली होती.  त्यानंतर पत्नी गर्भवती राहिल्याने कुटूंबातील व्यक्ती सुनेचा मानसिक शारिरीक जाच करू लागले. घरामध्ये या विषयावरून वाद विवाद वाढू लागला. यामुळे पीडीत महिला चांगलीच वैतागली होती.

पीडितेलाही माहित नव्हतं की पतीने नसबंदी केली असतानाही ती गर्भवती कशी राहिली. यामुळे तिने अजमेरची जिल्हाधिकारी आरती डोगरा यांच्याकडे घडलेली सर्व हकीकत सांगितली. डोगरा यांनी महिलेला धीर दिला आणि तपास करण्यास सुरूवात केली.

जिल्हाधिकारी आरती डोगरा यांनी त्या तरूणाची नसबंदी कुठल्या डॉक्टरने केली होती याबाबत माहिती घेतली. यानंतर डोगरा यांना जी माहिती मिळाली ती ऐकून सगळेच हवालदिल झाले. डॉ भगवानसिंग गहलोत यांनी  नसबंदीची शस्त्रक्रिया केली होती. त्यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली नव्हती.

जिल्हाधिकारी आरती डोगरा यांनी महिलेच्या मदतीला धावून जात तिचा संसार उध्दवस्त होण्यापासून वाचवला आहे. यामुळे  कुटूंब सूनेला त्रास देत होतं त्यांना आता खरं कारण समजलं आहे. १०० नसबंदीच्या शस्त्रक्रियेपैकी एखादी शस्त्रक्रिया अयशस्वी होत असल्याचं डॉक्टरांनी सांगीतलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
सोलापुरात कोरोना नियमांची ऐशी तैशी; काँग्रेसच्या युवा नेत्याच्या अंत्यसंस्काराला जमली तुफान गर्दी 
ट्री मॅन ऑफ इंडिया: तब्बल १ कोटींपेक्षा जास्त झाडे लावली, झाडे लावण्यासाठी जमीनही विकली
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस सतर्कतेचा, ताऊते चक्रीवादळ राज्यावर धडकणार; ‘अशी’ घ्या काळजी
मोठी बातमी! ऑक्सिजनचा काळाबाजार केल्याप्रकरणी बड्या उद्योगपतीस अटक

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.