गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. ‘तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु’, असं वादग्रस्त विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी यांसह इतर पक्षांनी राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता.(A rickshaw driver from Pune read Hanuman Chalisa and Quran together)
या दरम्यान पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील हिंदू-मुस्लिम रिक्षाचालकांनी एकत्र येऊन हनुमान चालिसा आणि कुराणचे पठण केले आहे. एका कार्यक्रमात हनुमान चालिसा आणि कुराणचे पठण करण्यात आले आहे. हनुमान चालिसा आणि कुराणचे एकत्र पठण पिंपरी चिंचवडमधील हिंदू-मुस्लिम रिक्षाचालकांनी एकात्मतेचा संदेश दिला आहे.
रिक्षाचालकांच्या या कृतीचे सर्वांनी कौतुक केलं आहे. रविवारी रामनवमी आणि रमजान या सणांचे औचित्य साधून हिंदू-मुस्लिम रिक्षाचालकांनी हनुमान चालिसा आणि कुराणच्या एकत्र पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हिंदू-मुस्लिम रिक्षाचालकांनी एकत्र कुराणमधील सुराह अल फतेह या आयातींचे पठण केले.
तसेच हनुमान चालिसेचे देखील पठण केले. दोन्ही धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, म्हणून कुराण आणि हनुमान चालिसा यांचे एकत्र पठण केल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक वातावरण ढवळून निघालं होतं.
वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत केलेल्या विधानावरून राज ठाकरेंवर टीका केली होती. मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही. त्यांची जबाबदारी आमची आहे. तुमचे सुपुत्र अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवाल सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केला होता.
मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी देखील राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेला विरोध केला होता. “मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. त्यामुळे मी कोणालाही हनुमान चालिसा लावण्यासाठी भोंगे लावू देणार नाही”, असे वसंत मोरे यांनी सांगितले होते. यावरून राज ठाकरे वसंत मोरेंवर नाराज देखील झाले होते. त्यानंतर वसंत मोरेंची पुणे शहराध्यक्ष पदावरून हक्कलपट्टी करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :-
कौतुकास्पद! छोट्याशा हेअर सलूनपासून IPL पर्यंत केला खडतर प्रवास, कुलदीप सेनची अनटोल्ड स्टोरी वाचून व्हाल थक्क
PHOTO: कोणत्याही हिरोइनपेक्षा कमी नाहीये अमरीश पुरी यांची मुलगी, दिसते खुपच सुंदर, करते ‘हे’ काम
काका-पुतण्यात खडाजंगी! मनसेचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान; ‘मातोश्रीत बसलेल्यांनी…’