अरे वा! जुळ्या मुलांची आई बनली प्रिती झिंटा; ‘या’ व्यक्तीचे आभार मानत सांगितली मुलांची नावे

बॉलिवूडची बबली अभिनेत्री प्रीती झिंटा हीच घर आनंदाने आणि उत्साहाने भरून गेले आहे. कारण या अभिनेत्रीच घर किलकर्यांनी गुंजले आहे. प्रीती झिंटा दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे.

प्रितीने तिच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ती तिच्या आनंदात सगळ्यांना सामील करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. पोस्टमध्ये प्रीतीने तिच्या दोन मुलांची नावेही चाहत्यांना सांगितली आहेत.

प्रिती झिंटाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या पतीसोबतच्या फोटोसह एक खास नोट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणते की, आज मला तुमच्या सर्वांसोबत आमची आश्चर्यकारक बातमी शेअर करायची आहे.

प्रिती म्हणते की, मी आणि जीन खूप आनंदी आहोत. आमच्या अंतःकरणात खूप कृतज्ञता आणि प्रेम भरलेल आहेत कारण आमच्या घरात दोन जुळ्यांनी जय झिंटा आणि जिया झिंटा यांनी जन्म घेतला आहे.

प्रिती झिंटाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, आम्ही आमच्या आयुष्याच्या नवीन टप्प्याबद्दल खूप उत्सुक आहोत. आमच्या अविश्वसनीय प्रवासाचा एक भाग झाल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेट्सचे मनःपूर्वक आभार. सर्वांना खूप खूप प्रेम.

प्रीती झिंटाच्या या पोस्टवरून ती सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रितीने तिच्या नव्या आयुष्याचे आनंदाने स्वागत केले आहे. प्रितीची पोस्ट शेअर होताच जगभरातील चाहते या जोडप्याला मुलांच्या जन्माबद्दल अभिनंदन करत आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सेलिब्रिटी खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. युलिया वंतूरपासून ते नर्गिस फाखरीपर्यंत, रकुल प्रीतने प्रीती आणि जीन गुडइनफ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रीती झिंटाने 29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजेलिसमध्ये जीन गुडइनफशी लग्न केले.

लग्नानंतर प्रिती लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली. काही मिनिटांतच प्रितीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आता अभिनेत्रीच्या चिमुकल्यांची झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला आहे.

महत्वाच्या बातम्या
…तर भारत देश जिहादी बनेल; कंगना पुन्हा बरळली
नमाज पढण्यासाठी हिंदू व्यक्तीने दिले दुकान; म्हणाला जागा कमी पडत असेल तर घर, अंगनही देईल
धक्कादायक! महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर उडाली खळबळ
रामसेतूच्या शूटिंगदरम्यान अक्षयला येतीय आईची आठवण; व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.