Share

Eknath Shinde : दसरा मेळाव्याला पाण्यासारखा पैसा ओतणाऱ्या शिंदेंची सीबीआय चौकशी होणार? थेट हायकोर्टातून अपडेट

eknath shinde

Eknath Shinde : बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा पार पडला. मात्र, यावेळी शिंदे गटावर एक आरोप करण्यात आला आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्यावर १० कोटी रुपये खर्च केल्याचा हा आरोप आहे.

त्यामुळे त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी १० कोटी किंवा त्याहून अधिक रुपये खर्च केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतरांविरोधात चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नोंदणी नसलेल्या पक्षाने दसरा मेळाव्यासाठी १० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे एवढा पैसे कुठून आले? याबाबत सीबीआय, आर्थिक गुन्हे शाखा आणि अंमलबजावणी संचालनालयासारख्या केंद्रीय एजन्सींनी चौकशी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते दीपक जगदेव यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते दीपक जगदेव यांनी दावा केला आहे की, मुंबई ते नागपूर या निर्माणाधीन समृद्धी महामार्गाचा वापर शिंदे गटाच्या समर्थकांना आणण्यासाठी केला गेला आहे. या महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नसून वाहतुकीच्या नियमांचे पालन झाले नसल्याचेही या याचिकेत सांगण्यात आले आहे.

तसेच या सगळ्यासाठी १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च केले गेले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एवढे पैसे कुठून आले? याचा स्रोत काय?, असे प्रश्न या याचिकेत करण्यात आले आहेत. या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालकांनी एसटी महामंडळाचे अधिकारी आणि समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर निष्काळजीपणामुळे फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती या याचिकेत याचिकाकर्त्याने केली आहे. त्यामुळे आता यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या
udhav thackeray : दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा चर्चा मात्र आनंद शिंदेंची; वाचा काय आहे उद्धव ठाकरेंचा प्लॅन?
Raj Thackeray : धनुष्यबाण गोठल्यावर शिवसेनेला डिवचणाऱ्या मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी जाहीर झापले; म्हणाले…
Sushma Andhare : आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now