Holi: होळी हा सण लहान मुलांसह मोठ्यांचाही प्रचंड आवडीचा आहे. भारताच्या विविध भागात होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. होळीच्या निमित्ताने कोरडे रंग, पाणी किंवा रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे एकमेकांच्या अंगावर फेकून आनंद साजरा केला जातो. पण हेच रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे खेळणं जीवघेणं ठरू शकत. तुम्हाला यावर विश्वास ठेवण्यास थोडं कठीण जाईल, पण अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे.
पाण्याने भरलेला फुगा डोक्यावर लागल्यामुळे तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबईतील विलेपार्ले येथे घडली आहे. काही लोक रंग खेळत होते. ते एकमेकांच्या अंगावर पाण्याने भरलेले फुगे फेकत होते. त्याचवेळी शिवाजी नगरच्या सिद्धिविनायक सोसायटीत राहणारे दिलीप धावडे हे तेथून जात होते.
त्यावेळी दिलीप यांच्या डोक्याला फुगा लागला, त्यामुळे ते जमिनीवर पडले. यानंतर आसपासच्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. पण वेळ निघून गेलेली होती. त्यावेळी डॉक्टरांनी दिलीप धावडेला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत दिलीपचा भाऊ शशिकांत धावडे याने विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .
ते म्हणाले, “दिलीप हा होळीच्या सणासाठी सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडला होता. वाटेत दोन गट एकमेकांवर रंगाने भरलेले फुगे फेकत होते. त्यादरम्यान माझ्या भावाच्या डोक्याला फुगा लागला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. मृत दिलीपचा मित्र म्हणाला, “दिलीप पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आम्ही त्याला नित्यानंद रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
४१ वर्षांचे दिलीप धावडे शेअर ट्रेडिंग कंपनीत कामाला होते. दिलीप धावडे विवाहित होते. त्यांच्या पश्चात पत्नी दर्शिका, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मोठी मुलगी स्वरा १२ वर्षांची असून धाकटा गौरेश ७ वर्षांचा आहे. आता पोलिस दिलीप धावडेच्या शवविच्छेदन अहवालाची वाट बघत आहेत. संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता अहवालातून लवकरच स्पष्ट होईल.
या संपूर्ण प्रकरणाबाबत विलेपार्ले पोलीस स्टेशनचे पीएसआय भरत गौरव यांनी सांगितले की, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा नाही, त्यामुळे अद्याप ही गोष्टी स्पष्ट झालेली नाही. दिलीपवर एका अज्ञात व्यक्तीने पाण्याने भरलेला प्लॅस्टिकचा फुगा फेकल्याचा आरोप मृताचे कुटुंबीय आणि मित्रांनी केला आहे, ज्यामुळे तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या
देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे मैत्रीचा हात; पहा नेमकं काय म्हणाले…
राजकीय भूकंप! राष्ट्रवादीची भाजपसोबत हातमिळवणी, राज्याच्या सरकारमध्येही सामील होणार
बच्चू कडूंचे दिवस फिरले! ‘या’ गुन्ह्यात कोर्टाने ठोठावली दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा