Uttar Pradesh : देशात आजही श्रद्धेच्या नावाखाली अनेक लोकांना लुटले जाते. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अनेकजण त्यांची फसवणूक करत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील बाप लेकाने पैसे लुबाडण्यासाठी भोळ्या भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला आहे.
या कुटुंबातील मुलांनी ऑनलाईन देवी देवतांच्या मूर्ती मागवल्या. त्यांनतर त्या आपल्या शेतात नेऊन गुपचूप पुरल्या. खोदकाम करण्याच्या बहाण्याने काही लोकांना शेतात घेऊन गेले. खोदकाम करताना या मूर्ती बाहेर आल्या. त्यांनतर त्या बापलेकांनी अतिशय चतुराईने या मूर्ती ५०० वर्षे जुन्या आहेत असे त्या लोकांना पटवून दिले.
संपूर्ण गावात ही बातमी पसरल्यानंतर त्याठिकाणी लोकांची गर्दी जमली. आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोक या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आले. दिवसभर हे लोक मूर्तीची पूजा करून फळे, फुलांसह पैसे दान करू लागले. दोन दिवसात तब्बल ३५ हजार रुपये दानपेटीत जमा झाले.
उत्तरप्रदेश येथील उन्नाव जिल्ह्यातील महमूदपूर गावातील ही घटना आहे. या प्रकरणाचा पोलिसांना संशय आल्यानंतर आरोपी अशोक कुमार आणि त्याच्या दोन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच हे सगळे पैसे कमवण्यासाठी केले असल्याचे त्यांनी कबुल केले आहे.
पोलिसांनी ही माहिती पुरातत्त्व विभागाला दिली. त्यांनतर त्या मूर्ती अशोक कुमार यांना त्यांच्या घरी ठेवण्यास सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी अशोक यांचा मुलगा रवी गौतम, विजय गौतम यांनी मूर्ती उचलून पुन्हा त्याच शेतात नेऊन ठेवल्या. त्यांनतर बाप आणि मुलांनी मिळून प्रसाद वाटण्यास सुरुवात केली.
पिशवीत प्रसाद घेऊन वडील आणि दोन्ही मुले बसले. जेव्हा लोक प्रसाद देण्यासाठी येऊ लागले तेव्हा रवीने सर्वांना प्रसाद वाटला. त्यांनतर लोक पुन्हा शेतात मूर्तीची पूजा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक पोलीसही तैनात करण्यात आला होता.
या सर्व प्रकारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते गोरेलाल या डिलिव्हरी बॉयने बघितले. या मूर्ती ऑनलाईन ऑर्डर केल्या असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. मिशो कंपनीकडून अशोकचा मुलगा रवी गौतमने या मूर्तींचा सेट १६९ रुपयांना ऑर्डर करून मागवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही डिलीवहिरी २९ ऑगस्टला करण्यात आली असून डिलिव्हरीच्या पावत्याही त्यांनी पोलिसांकडे दिल्या.
महत्वाच्या बातम्या
NCP : आघाडीत बिघाडी! मिटकरींचा एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ माझ्याकडे, NCP पदाधिकाऱ्याचा दावा
Lonavala: सर्वांना खळखळून हसवणारा लक्ष्या शेवटच्या दिवसांत पडला होता एकटा, वाचा लोणावळ्यात काय झालं होतं
ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून जेवण घेण्यास दिला स्पष्ट नकार; अन् केलं असं काही केली वाचून तुम्हाला येईल चीड
“हे योग्य आहे का ? ३५ वर्षे काम केलेल्या निष्ठावंतांना ३२ वर्षांच्या आदित्य ठाकरेंचं ऐकावं लागत होतं”