उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पायी निघाला, पतीच्या खांद्यावर पत्नीचा करुण अंत झाला..

ऑगस्टमध्ये रजेवर गेलेल्या पावसाने पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावली असून गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पाऊस मनसोक्त बरसताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत.

अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरून तर अनेक भागात दरड कोसळल्याने गावांचा शहराशी संपर्क तुटलेला पाहायला मिळाला. अश्याच एक परिस्थिती मुळे नंदुरबार मधील चांदसैली घाटात एक दुर्दैवी घटना घडली आहे.

दरड कोसळून घाटातील रस्ता बंद झाल्याने योग्यवेळी उपचारासाठी दवाखान्यात न पोचल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सिदलिबाई पाडवी असे महिलेचे नाव असून मिळालेल्या माहितीनुसार सिदलीबाई आजारी असून त्यांना उपचाराची नितांत गरज होती, मात्र घाटात दरड कोसळल्याने शहराकडे जाणारा मार्ग बंद झाला.

आपल्या पत्नीचे प्राण वाचवण्यासाठी सिदली बाई यांच्या पतीने धडपड केली आणि पत्नीला खांद्यावर घेऊन पायी प्रवास केला. पतीने त्याच्या पत्नीला वाचविण्यासाठीची ही केविलवाणी धडपड अखेर अयशस्वी ठरली आणि सिदली बाई यांची प्राणज्योत वाटेतच मालवली.

संपुर्ण महाराष्ट्रासाठी ही एक दुःखद घटना आहे. उद्यमशील महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्र, शेतकऱ्यांचा महाराष्ट्र अश्या कितीही मोठ्या घोषणांचा अवडंबर माजवला तरी अजूनही खेड्या पाड्यात साध्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा या घटनेत दिसून येते.

सदर घटनेमुळे तेथील स्थानिक लोकांनी पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने पावसाच्या वेळी किंव्वा दरड कोसळली की होणारी आबाळ या बद्दल असंतोष व्यक्त केला असून अजून किती जीव गेले की सरकारला जाग येणार आहे असा प्रश्न विचारला आहे.

 

महत्वाच्या बातम्या
ब्रेकींग! टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा, धोनीसह ‘या’ खेळाडूंची झाली निवड
शार्दुल ठाकूर: पालघरच्या या राजाने ऑस्ट्रेलिया ते इंग्लंडच्या बड्या क्रिकेटर्सच्या नाकीनऊ आणलेत

उकळत्या पाण्यात ध्यान लावून बसला चिमुकला; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
‘माझ्या मुलानं मुलींना डेट करावे, ड्रग्स आणि सेक्स या गोष्टी देखील कराव्या’- शाहरुख खान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.