Supreme Court : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षाचा वाद सुरु आहे. या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्यापैकी खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय आज होणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्टाची सुनावणी सुरु झाली आहे
यावेळी दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात येत आहे. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली आहे. त्यांच्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनीदेखील ठाकरे गटाची बाजू मंडळी आहे. त्यांनतर आता शिंदे गटाचा युक्तिवाद सुरु झाला आहे.
शिंदे गटाकडून नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला आहे. १९७२ सालच्या सादिक अली केसचा दाखला देत नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला आहे. ठाकरे गट फक्त विधिमंडळ पक्षाचा विचार करतो असे ते म्हणाले आहेत. पक्षचिन्हाचा वाद परिच्छेद – १५ नुसार सोडवता येईल असेही कौल म्हणाले आहेत.
त्यांच्यानंतर मनिंदर सिंग यांनीदेखील शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद केला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हाच त्यांनी बहुमत गमावल्याचे सिद्ध झाले, असे ते म्हणाले आहेत. नरहरी झिरवळ यांच्याबाबतीत सुद्धा शिंदे गटाकडून काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
जोपर्यंत सभागृहाचा नरहरी झिरवळ यांच्यावर विश्वास आहे तोपर्यंतच ते काम करू शकतात. असा युक्तिवाद सिंग यांनी केला आहे. तसेच मतभेद आणि विरोध करणे हे लोकशाहीचे अधिकार आहेत, असेही शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग कोर्टात म्हणाले आहेत.
सकाळी १०.३० वाजतापासून सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून विविध युक्तिवाद करण्यात येत आहेत. सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये आज कोणाच्या बाजूने निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
shivsena : मोठी बातमी : सुनावणी सुरु होताच धनुष्यबाणाबाबत कोर्टाचा पहिला मोठा आदेश, वाचा नेमकं काय झालं?
Supreme Court : एकनाथ शिंदे कोणत्या अधिकाराने निवडणूक आयोगाकडे गेले? सुप्रीम कोर्टाचा मोठा प्रश्न
Eknath shinde : ..तर आजच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार; कायदेतज्ञांनी सांगीतली कायदेशीर बाजू
shivsena : शिंदे गटात सामील व्हायला नकार दिलेल्या बड्या शिवसेना नेत्याला तडीपारीची नोटीस