मुस्लिम कृष्णभक्तानं गायलं महाभारताचं टायटल सॉंग; गळ्यातून काढला शंखाचा आवाज, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतूक कराल

मुंबई। बऱ्याचदा हिंदू व मुस्लिम यांच्यातील वाद हे सोशल मीडियावर किंवा प्रत्येक्षात देखील समोर येत असतात. अशी बरीचशी उदाहरण आहेत त्यामुळे हिंदू व मुस्लिम यांच्यातील वाद जगासमोर आले आहेत. मात्र सध्या एका मुस्लिम व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे.

ज्यात तो व्यक्ती महाभारत मालिकेचं शीर्षकगीत गात आहे. तसेच तो या व्हिडिओत शंखाचा आवाज देखील काढत आहे. गाणाऱ्या व्यक्तीचा आवाज अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे. स्पष्ट उच्चार, अचूक लय यामुळे अनेकांनी गाणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक मुस्लिम व्यक्ती महाभारत मालिकेचं शीर्षकगीत गात आहे. हा व्हिडिओ डॉक्टर नागर या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व सोबत कॅप्शनदेखील लिहिलं आहे. हा व्हिडिओ सध्या भन्नाट व्हायरल होत असून सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एक मुस्लिम व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभा राहून महाभारत मालिकेचं शिर्षकगीत गात आहे. गाणाऱ्या व्यक्तीचा आवाज अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे. महाभारताच्या शीर्षक गीतामध्ये शंख फुंकण्याचा आवाज आहे. तो देखील मुस्लिम व्यक्तीनं अतिशय सुंदररित्या काढला आहे.

या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स येत असून आता हा व्हिडिओ भन्नाट व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोन धर्मांना जोडणारा आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. व या व्यक्तीचं कौतुकदेखील केलं जातं आहे. हा व्यक्ती कोण आहे किंवा हा व्हिडिओ कुठचा आहे अद्यापही समजलेलं नाही.

याआधी असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यात बऱ्याचदा हिंदू व मुस्लिम यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र या व्यक्तीन आपल्या धर्मसोबतच हिंदू धर्मालादेखील समान मान दिल्यानं सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या
सोनू सूदच्या कंपनीचे थेट काँग्रेसच्या मंत्र्याशी कनेक्शन, आयकर विभागाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड
क्रूरतेचा कळस! दारूच्या नशेत आईचं पोटच्या मुलीसोबत अमानुष कृत्य; गाडीला बांधलं अन् फरफटत नेलं…
शाळेत असताना टायरच्या पंक्चर काढायचा, जिद्दीच्या जोरावर २३ व्या वर्षी झाला कलेक्टर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.