मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत पळून जाऊन केलं लग्न, मात्र आता दोघांना जीवे मारण्याच्या धमक्या सूरू

सुरत। लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे मुद्दे नेहमी चर्चेत असतातच. आधीपासूनचं लव्ह जिहादचे अनेक प्रकरणं समोर आली आहेत. हिंदू धर्मातील मुलींशी प्रेमाचे नाटक करून त्यांच्याशी विवाह करून त्याचं धर्मांतर करण्याच्या प्रकाराला लव्ह जिहाद म्हणून ओळखलं जातो.

व याला कायम अनेकांचा विरोध असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र आता याच संदर्भात एक घटना समोर आली आहे. गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील खंभाट येथे राहणाऱ्या एका मुस्लीम मुलीनं एका हिंदू मुलाबरोबर पळून जाऊन प्रेमविवाह केला असून, तिच्या कुटुंबीयांकडून आता धमक्या मिळत असल्यानं तिनं पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

फरमीन बानो असं या मुलीचं नाव असून, तिनं आपला प्रियकर प्रदीप पुराणी याच्याशी विवाह केला आहे. 17 जून रोजी फरमीन बानू यांनी आपलं घर सोडलं होतं. व 19 जून रोजी या दोघांनी कोर्टात लग्न केलं.

मात्र आता या दोघांना फरमीन बानू हिचे वडील मोहम्मद फुरकान सय्यद, मामा ऐजाज सय्यद आणि इतर नातेवाईक ताकीर सय्यद, फिरोज पठाण उर्फ (फंटर), सोहिल, सद्दाम सय्यद (चप्पल), हमदान सय्यद, तौसेफ सय्यद आणि जमशेद पठाण हे आमचं काही बरंवाईट झाल्यास जबाबदार असतील फरमीन बानू हिने पोलिसांना लिहिलेल्या अर्जात म्हटलं आहे.

तसेच फरमीननं लग्नानंतर त्या दोघांचा एक व्हिडिओही बनवला होता. यामध्ये फरमीन आणि प्रदीप आपल्या सुरक्षिततेसाठी विनवणी करताना दिसत आहेत.

30 सेकंदाचा हा व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता, तो चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर तिने आता आपल्या सुरक्षेसाठी पुन्हा मागणी केली आहे. तसेच तिने लिहीलेल्या पत्रात अनेक गोष्टीचे स्पष्टीकरण तिने दिले आहे.

महत्वाच्या बातम्या
बाबो! गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट,एलियन असल्याचा लोकांचा अंदाज
बॅंकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून बॉलीवूडमध्ये नाव करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होत्या रिमा लागू
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेसकडे, अध्यक्षपदासाठी या मोठ्या नावाची चर्चा
राज ठाकरे यांच्या वेगळ्या भूमिकेनंतर देखील आमदार राजू पाटील त्या आंदोलनात होणार सहभागी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.