Share

Madhya Pradesh : प्रेमापोटी मुस्लिम तरुणीने स्वीकारला हिंदू धर्म, कुटुंबियांकडून धोका असल्याचे सांगत पोलिसांकडे केली ‘ही’ मागणी

Madhya Pradesh

Madhya Pradesh : मध्यप्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यामध्ये एका मुस्लिम मुलीने हिंदू धर्म स्वीकारल्याची बातमी समोर आली आहे. मुस्लिम धर्मात जन्मलेल्या या मुलीने एका हिंदू मुलासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला आहे. पंचतत्त्व स्नान आणि पूजा करून शुक्रवारी संध्याकाळी तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे.

राहुल वर्मा मंदसौर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी राहुल आणि इकरा नावाच्या मुस्लीम युवतीचे प्रेम जडले. त्यावेळी ते अल्पवयीन होते. मात्र, आता प्रौढ झाल्यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. राहुलच्या घरच्यांची या लग्नाला हरकत नव्हती.

राहुलच्या कुटुंबीयांनी त्या दोघांचा करार विवाह केला. नंतर शुक्रवारी हिंदू पद्धतीने त्यांचे लग्न लावून दिले. त्यानंतर मंदसौरच्या गायत्री मंदिरात दूध, शेण आणि गोमुत्रासह पंचतत्वाने इकराचे स्नान करण्यात आले. तिला इशिका हे नवीन नाव देण्यात आले.

या मुलीने सांगितले की, तिने हे सगळे तिच्या ईच्छेने आहे. तसेच तिला तिच्या कुटुंबियांकडून आणि मुस्लिम समाजातील लोकांकडून धोका आहे. त्यामुळे त्या दोघांनीही सुरक्षेची मागणी केली आहे. यावेळी तीन महिन्यांपूर्वी हिंदू धर्म स्वीकारलेल्या चेतन सिंग (नाव जफर शेख) याने या दोघांना मदत केली.

मंदसौर येथील रहिवासी असलेल्या जफर शेख याने तीन महिन्यांपूर्वी मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. या प्रकरणात पुढे शहर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये लेखी माहिती देण्यात आली. त्यांनतर तिथल्या पोलिसांच्या माहितीची प्रत गायत्री मंदीर याठिकाणी दाखवण्यात आली.

तिथे तरुणीचा धर्म बदलून दोघांनी लग्न केले. इशिका आणि राहुल वेगवेगळ्या धर्माचे असूनही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. मात्र, इशिकाला तिच्या कुटुंबियांकडून धोका वाटत असल्याने तिने सुरक्षेची मागणी केली आहे.

महत्वाचा बातम्या
Shivsena : शिवसेना नेते अरविंद सावंतांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मनसे आक्रमक; मुंबईत राड्यावर राडे
अजित पवार यांचं नाराजीनाट्य! शरद पवारांसमोरच ड्रामा; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात नक्की काय घडलं? वाचा..
Udhhav thackeray : शिंदे गटाला भिडणाऱ्या शिवसैनिकांचे जेलमधून सुटताच मातोश्रीवर जल्लोषात स्वागत; ठाकरेंनी दिली शाबासकी
Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! राज्यघटनेचं उल्लंघन केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सापडले अडचणीत

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now