लग्न जमल्यानंतर जोडीदाराला अश्लील मेसेज पाठवणे चुकीचे नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

लग्नाआधी ‘स्त्रीला अश्लील मेसेज’ पाठवणे हा एखाद्याच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ शकत नाही, असे म्हणत मुंबईतील एका न्यायालयाने लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार प्रकरणातून एका पुरुषाची निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, लग्नापूर्वी मंगेतराला पाठवलेले मेसेज एकमेकांच्या भावना आणि आनंद समजून घेण्यासाठी विचारात घेतले जाऊ शकतात.

११ वर्षांपूर्वी एका ३६ वर्षीय तरुणावर त्याच्या मंगेतरने लग्नाच्या बहाण्याने बलात्काराचा आरोप केला होता आणि गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने म्हटले, जर एखाद्या व्यक्तीला समोरची व्यक्ती आवडत नसेल आणि त्या व्यक्तीने तिचे दुःख कुणा तिसऱ्या व्यक्तीला सांगितले जेणेकरुन अशी चूक टाळता यावी तर तो त्या व्यक्तीचा अधिकार आहे.

“या संदेशांचा उद्देश मंगेतरासमोर आपल्या इच्छा व्यक्त करणे, लैंगिक भावना जागृत करणे इत्यादी असू शकतात, हे संदेश मंगेतरला आनंदी देखील करू शकतात.” पण असे म्हणता येणार नाही कि, असे एसएमएस कोणासोबत तरी लग्न करणार असलेल्या महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतील.

विशेष म्हणजे, महिलेने २०१० मध्ये त्या पुरुषाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. हे जोडपे २००७ मध्ये एका लग्नाच्या ठिकाणी भेटले होते. तरुणाच्या आईचा या लग्नाला विरोध होता. २०१० मध्ये तरुणाने तरुणीसोबत असलेली सर्व नाती संपवली.

न्यायालयाने तरुणाची निर्दोष मुक्तता करताना म्हटले आहे की, लग्नाचे आश्वासन देऊन पाठ फिरवणे याला फसवणूक किंवा बलात्कार म्हणता येणार नाही. न्यायालयाने सांगितले की, तरुण मंगळसूत्र घेऊन एका आर्य समाजाच्या हॉलमध्ये गेला होता. पण लग्नानंतरच्या भांडणामुळे आणि नंतरच्या परिस्थितीमुळे तो मागे हटला आणि आपल्या आईकडे परत गेला.

तरुणाने आपल्या आईच्या इच्छेचे पालन केले आणि समस्येचा सामना करण्याऐवजी ते टाळण्याचा प्रयत्न केला. त्याला समस्या नीट सोडवता न आल्याने तो परतला. लग्नाचे खोटे आश्वासन दिल्याचे हे प्रकरण नाही. योग्य प्रकारे प्रयत्न न केल्याने लग्न न टिकल्याचे हे प्रकरण आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.