बाबा तु लवकर घरी ये, तुझी खुप आठवण येतेय; क्रिकेटपटूच्या लेकीनं काढलं मन हेलावून टाकणारं चित्र

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. असे असताना देखील देशात आयपीएलचे सामने सुरू होते मात्र अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने आता आयपीएल रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

देशात कोरोनाने हाहाकार माजवला असूनही आयपीलवर कोट्यावधी रुपये खर्च केले जात असल्याने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेवर टीका केली होती. अखेर आयपीएल अनिश्चित काळासाठी रद्द झाल्याने खेळाडू आपआपल्या देशात परतण्याची शक्यता आहे.

अशातच आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळणार डेव्हिड वॉर्नर याने सोशल मिडियावर एक भावूक करणारा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये एक चित्र काढले आहे.  डेव्हिड वॉर्नरच्या चिमुकल्या लेकीने हे चित्र काढले आहे.

फोटोमध्ये पाहू शकता, एका पेजवर तीन मुलींचे आणि डेव्हिड वॉर्नर आणि  त्याची पत्नी असल्याची चित्रे काढली आहेत. त्याला मुलीने नावं दिली आहेत. चित्राच्या खाली लिहिले की, बाबा तु लवकर घरी ये, आम्हाला तुझी खुप आठवण येत आहे.

क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरला इव्ही, इंडी आणि इस्ला या तीन मुली आहेत. त्यांनी चित्र काढत वडीलांवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीनेही मुली चित्र काढत असल्याचा फोटो शेअर केला आहे.

देशात कोरोनाची गंभीर परिस्थीती आहे. यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या लेकीने वडीलांच्या काळजीने हे चित्र काढलं असल्याचं दिसत आहे. डेव्हिडच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

डेव्हिड वॉर्नर हा सनरायजर्स हैद्राबादचा कर्णधार आहे. मात्र आयपीएलच्या १४ व्या हंगामात हैद्राबादने ७ पैकी ६ सामने गमावले आहेत. डेव्हिड वॉर्नरला चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळे त्याला कर्णधार पदावरून काढून केन विलियनसनची कर्णधार पदी नियुक्ती केली होती.

कर्णधार पदावरून काढून त्याला संघामध्येही स्थान देण्यात आलं नव्हतं. २०१६ मध्ये आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैद्राबादने पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले होते. तर २०१८मध्ये उपविजेते पदापर्यंत हैद्राबादने मजल मारली होती.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! अखेर कोरोनामुळे आयपीएल रद्द, बीसीसीआयची माहिती
VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला
पोलार्डच्या वादळात चेन्नई भूईसपाट; मुंबईच्या वाघाने चेन्नईच्या तोंडातील विजय खेचून आणला
आता मृत्यू जवळ आला आहे…; बॉलिवूडचा खलनायक कोरोनाचा हाहाकार पाहून घाबरला

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.