मध्य प्रदेशच्या शिक्षण धोरणात मोठा बदल; प्रभू रामचंद्रांमधील इंजीनियरिंगचे गुण, रामचरितमानस, ध्यान, महाभारताचे दिले जाणार मुलांना धडे

नवी दिल्ली। मध्यप्रदेशातील शिक्षण धोरणात बदल करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत बीएच्या पहिल्याव वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाभारत, रामचरितमानस, योग आणि ध्यान यासंदर्भात शिकवलं जाणार आहे. नवीन अभ्यासक्रमानुसरा ‘श्री रामचरितमानस अप्लाइड फिलॉसफी’ हा पर्यायी विषय म्हणून ठेवण्यात आलाय.

त्याचप्रमाणे इंग्रजीच्या फाउंडेशन कोर्समध्ये पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सी. राजगोपालचारी यांनी लिहिलेली महाभारताची प्रस्तावना शिकवली जाणार आहे. तसेच राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजी आणि हिंदीबरोबरच योग आणि ध्यान या दोन विषयांना तिसऱ्या फाउंडेशन कोर्सच्या रुपामध्ये शिकवलं जाणार आहे.

यामध्ये ‘अमो ध्यान’ आणि मंत्रांसंदर्भातील अभ्यासाचा समावेश आहे.. ‘वेद, उपनिषदं आणि पुराणांचे चार युग’, ‘रामायण आणि श्री रामचरितमानसमधील फरक’ आणि ‘दिव्य अस्तित्वाचा अवतार’ हे विषयही शिकवले जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना श्री रामचंद्र हे किती कुशल अभियंता म्हणजेच इंजीनियर होते याचंही शिक्षण दिलं जाणार आहे. श्री रामचरितमानसबरोबर २४ पर्यायी विषय देण्यात आले असून यामध्ये मध्य प्रदेशातील उर्दू गाणी आणि उर्दू भाषा यांचाही समावेश आहे. मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री मोहन यादव म्हणाले आहेत की, “आपण रामचरितमानस आणि महाभारताकडून बरंच काही शिकलोय.

त्यामुळे विद्यार्थ्यांना सन्मान देणं म्हणजे काय आणि इतर मुल्यांसोबतच जीवनामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. आता आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं नाहीय तर त्यांना महान व्यक्ती म्हणून विकसित करायचं आहे,” असं यादव यांनी म्हटलं आहे. मात्र बदल झालेल्या अभ्यासक्रमावर विरोधकांनी टीका केली आहे.

“आमच्याकडून महाभारत, गीती आणि रामचरितमानस अभ्यासक्रमामध्ये शिकवण्याला काहीच विरोध नाहीय. मात्र विद्यार्थ्यांमध्ये सांप्रदायिक सद्भावना विकसित करण्यासाठी त्यांना अभ्यासक्रमामध्ये बायबल, कुरणा आणि गुरु ग्रंथ साहिबसारखे धार्मिक ग्रंथही शिकवले पाहिजेत. मात्र असं ते (सत्ताधारी) करणार नाही कारण ते त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे,” असं काँग्रेसचे नेते पीसी शर्मा यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
‘…म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला’; संजय राठोड यांचा मोठा खुलासा
“रोग, बेरोजगारी, माफिया राज आणि भ्रष्टाचार वगळता, काँग्रेस, सपा आणि बसपा सरकारांनी राज्याला काय दिले? 
मोठी बातमी! निलेश राणे उतरणार विधानसभेच्या आखाड्यात? आमदार होऊदे असं गणपतीकडे साकडं 
२४ वर्षांपासून बंद लिफ्टच्या आतमध्ये दडून होते हे रहस्य, लिफ्ट उघडताच जे समोर आले, पाहून सगळ्यांचा थरकाप उडाला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.