Salman Khan : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान(Arbaaz Khan) आणि त्याची पत्नी शूरा खान यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. ‘पिंकव्हिला’च्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये दोघंही एका गायनॅकॉलॉजिस्टच्या क्लिनिकबाहेर दिसून आले. यामुळे शूरा खान गर्भवती असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
व्हिडीओमधून उघड झालं गुपित?
व्हिडीओमध्ये शूरा खानने असा ड्रेस परिधान केला आहे, की तिचा बेबी बंप झाकला जावा. मात्र, सर्व प्रयत्न करूनही कॅमेऱ्यांपासून बचाव होऊ शकला नाही आणि तिला बेबी बंपसह पाहिलं गेलं. या दृश्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून अरबाज(Arbaaz Khan) आणि शूराला शुभेच्छा देणाऱ्यांचा ओघ सुरू* झाला आहे.
अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष
जरी सोशल मीडियावर चर्चांचा जोर असला, तरीही अरबाज खान(Arbaaz Khan) किंवा खान कुटुंबातील कुणीही याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या ईद पार्टीत शूरा प्रेग्नंट असल्याची कुजबुज झाली होती. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ती चर्चा पुन्हा एकदा तेजीत आली आहे.
अरबाजचा वैयक्तिक प्रवास
अरबाज खानने(Arbaaz Khan) 31 व्या वर्षी मलायका अरोराशी विवाह केला होता, आणि त्यांना एक मुलगा आहे – आरहान खान, जो सध्या 23 वर्षांचा आहे. 27 वर्षांच्या संसारानंतर दोघं वेगळे झाले आणि डिसेंबर 2023 मध्ये अरबाजने सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत दुसरं लग्न* केलं. आता वयाच्या 57 व्या वर्षी तो पुन्हा एकदा वडील होणार असल्याचं संकेत* मिळत आहेत.
सलमान खानच्या चाहत्यांमध्येही आनंद
काही दिवसांपूर्वी सलमान खानला धमकी आल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत होते. मात्र, आता सलमान पुन्हा एकदा *काका होणार असल्याची शक्यता असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
काहीही असो, खान कुटुंबात एका नव्या पाहुण्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे बॉलिवूडप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.
a-little-guest-will-come-to-salman-khans-house