विनामास्क फिरणाऱ्यांना पत्रकाराने शिकवला धडा; एकदा ‘हा’ भन्नाट व्हिडीओ बघाचं

पटना। जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ आहे. अशात खबरदारी म्हणून वारंवार प्रशासन आणि पोलिसांकडून सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याबाबत आवाहन केले जात आहे.
तरी देखील नागरिक या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र वेळोवेळी पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून कधी दंड आकारून तर कधी शिक्षा करून नागरिकांना याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान सध्या एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पत्रकाराने गाढवाची मुलाखत घेतली आहे. गाढवाची मुलाखत घेत असताना त्यासोबत तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनाही हा पत्रकार प्रश्न विचारत आहे.
यामध्ये विनामास्क आणि सॅनिटाइझ न करता रस्त्यावर बसलेल्या गाढवाची मुलाखत घेत मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याबाबत जनजागृती केली जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे.
या मुलाखतीमार्फत जे लोक मास्क वापरत नाहीत, नियमांचे उल्लंघन करतात, अशांची तुलना गाढवासोबत करून नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. याला सोशल मीडियावर युझर्सकडून कौतुकाची थापही मिळत आहे.
गाढवाची मुलाखत घेणाऱ्या या पत्रकाराचा व्हिडीओ पाहून चाँद नवाबची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मास्क न घालणाऱ्या लोकांची गाढवासोबत तुलना करून या पत्रकाराने एकप्रकारे खिल्ली उडवली आहे.
मात्र तरी देखील मास्क घालणे तसेच नियमांचे पालन करणे किती अत्यावश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न यात अनोख्या पद्धतीने केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
That’s an innovative way to spread awareness. Kudos to this guy pic.twitter.com/HenpeOaHA0
— Roop Darak BHARTIYA (@iRupND) July 21, 2020
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.