असा क्रांतिकारी सैनिक ज्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ना नोकरी मिळाली ना उपचार, वाचा ह्रदयद्रावक कहाणी

बटुकेश्वर दत्त हे असे महान क्रांतिकारक आहेत ज्यांचे चाहते शहीद-ए-आझम भगतसिंग देखील होते. त्यामुळेच त्यांनी लाहोर सेंट्रल जेलमध्ये दत्त यांचा ऑटोग्राफ घेतला. पण स्वतंत्र भारतातील सरकारांनी दत्त यांची पर्वा केली नाही. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे त्यांचा जीवनसंघर्ष.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी १५ वर्षे तुरुंगात घालवलेल्या बटुकेश्वर दत्त यांना स्वतंत्र भारतात नोकरीसाठी भटकंती करावी लागली. कधी त्यांना सिगारेट कंपनीचा एजंट व्हावं लागलं तर कधी टुरिस्ट गाईड म्हणून पर्यटनाच्या रस्त्यांवर फिरावं लागलं. ज्या स्वतंत्र भारतात त्यांना डोक्यावर बसवायला पाहिजे होत तिथं त्यांची प्रचंड उपेक्षा झाली.

विष्णू शर्मा यांनी त्यांच्या ‘गुमनाम नायकों की गौरवशाली गाथाएं’ या पुस्तकात दत्तबद्दल तपशीलवार लिहिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दत्त यांचे मित्र चमनलाल आझाद यांनी एका लेखात लिहिले आहे की, दत्तांसारखा क्रांतिकारक भारतात जन्माला यायला पाहिजे का? देवाने आपल्या देशात एवढ्या महान योद्ध्याला जन्म देऊन मोठी चूक केली आहे.

ज्या व्यक्तीने देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि जी व्यक्ती फाशीच्या कचाट्यातून थोडक्यात निसटली, ती व्यक्ती आज अत्यंत दयनीय अवस्थेत रुग्णालयात टाच घासत पडून आहे आणि त्यांना कोणी विचारणार नाही, ही खेदाची बाब आहे.

बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० रोजी वर्धमान (बंगाल) पासून २२ किमी अंतरावर असलेल्या ऑरी नावाच्या गावात झाला. हायस्कूलच्या अभ्यासासाठी ते कानपूरला आले आणि तिथे त्यांची भेट चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाली. १९२८ मध्ये स्थापन झालेल्या हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे ते सदस्य झाले. येथेच त्यांची भगतसिंग यांच्याशी भेट झाली. ते बॉम्ब बनवायला शिकले. दोन क्रांतिकारकांची मैत्री किती घट्ट होती, याचे उदाहरण हुसैनीवालामध्ये पाहायला मिळते.

बटुकेश्वर दत्त १९६४ मध्ये आजारी पडले. पाटणाच्या सरकारी दवाखान्यात त्यांना विचारणारे कोणी नव्हते. माहिती मिळताच पंजाब सरकारने बिहार सरकारला एक हजार रुपयांचा धनादेश पाठवला आणि मुख्यमंत्री केबी सहाय यांना पत्र लिहून सांगितले की, बटुकेश्वर दत्त यांच्यावर पाटण्यात उपचार होऊ शकले नाहीत, तर राज्य सरकार त्यांच्या उपचाराचा खर्च उचलण्यास तयार आहे.

दत्त यांच्यावर उपचार सुरू झाले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 22 नोव्हेंबर 1964 रोजी त्यांना दिल्लीत आणण्यात आले. येथे पोहोचल्यावर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ज्या दिल्लीत त्याने बॉम्ब फोडला होता, तिथे अंथरुणाला खिळून स्ट्रेचरवर आणले जाईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते.

बटुकेश्वर दत्त यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर कळले की त्यांना कॅन्सर झाला आहे आणि त्याच्या आयुष्याचे काहीच दिवस बाकी आहेत. काही वेळाने पंजाबचे मुख्यमंत्री राम किशन त्यांना भेटायला आले. बटुकेश्वर दत्त पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ‘माझे अंत्यसंस्कार माझे मित्र भगतसिंग यांच्या समाधीशेजारी व्हावेत, ही माझी शेवटची इच्छा आहे.’

२० जुलै १९६५ रोजी रात्री १.५० वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. बटुकेश्वर दत्त यांच्या शेवटच्या इच्छेला मान देऊन, भारत-पाक सीमेजवळ हुसैनीवाला येथे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या समाधीजवळ त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.

भगतसिंग हे स्वातंत्र्यसैनिक बटुकेश्वर दत्त यांचे प्रशंसक होते. त्याचा एक पुरावा त्यांच्या जेल डायरीत आहे. त्यांनी बटुकेश्वर दत्त यांचा ऑटोग्राफ घेतला होता. बटुकेश्वर आणि भगतसिंग लाहोर सेंट्रल जेलमध्ये कैद होते. बटुकेश्वरला लाहोर तुरुंगातून हलवण्याच्या चार दिवस आधी भगतसिंग तुरुंगातील १३७ क्रमांकाच्या सेलमध्ये त्यांना भेटायला गेले होते. ही तारीख होती 12 जुलै 1930. या दिवशी त्यांनी त्यांच्या डायरीच्या पान क्रमांक 65 आणि 67 वर त्यांचा ऑटोग्राफ घेतला.

डायरीची मूळ प्रत भगतसिंग यांचे वंशज यादवेंद्र सिंग संधू यांच्याकडे आहे. शहीद भगतसिंग ब्रिगेडचे अध्यक्ष आणि त्यांचे पणतू संधू यांनी सांगितले की, शहीद-ए-आझम बटुकेश्वर दत्त यांना आपला सर्वात खास मित्र मानत होते. हा ऑटोग्राफ म्हणजे भगतसिंग यांच्याबद्दलचा आदर होता. आता भेटणार नाही याची जाणीव दोघांनाही झाली असावी. म्हणून त्याने ही सही घेतली.

सार्वजनिक सुरक्षा विधेयक आणि व्यापार विवाद विधेयक ब्रिटिश संसदेत मांडण्यात आले. स्वातंत्र्य सैनिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना अधिक अधिकार देणे हा त्यामागचा हेतू होता. दत्त, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना विरोध करायचा होता.

दत्त यांनी भगतसिंग यांच्यासोबत ८ एप्रिल १९२९ रोजी सेंट्रल असेंब्लीमध्ये दोन बॉम्ब फोडले आणि अटक झाली. बटुकेश्वर हेच सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब घेऊन गेले होते. यादवेंद्र संधू म्हणतात की, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यावर बॉम्ब फेकण्याव्यतिरिक्त साँडर्स यांच्या हत्येचा आरोप होता. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर बटुकेश्वर यांना काला पानीची शिक्षा झाली. त्यांची रवानगी अंदमानमधील कुप्रसिद्ध सेल्युलर जेलमध्ये करण्यात आली. कालापानी तुरुंगात त्यांनी उपोषण केले.

तेथून त्यांना १९३७ मध्ये पाटणा येथील बंकीपूर मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. 1938 मध्ये त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात उडी घेतली. त्यामुळे दत्तला पुन्हा अटक झाली. चार वर्षांनंतर 1945 मध्ये त्यांची सुटका झाली. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. त्यावेळी ते पाटणा येथे राहत होते.

तिथे त्यांना उदरनिर्वाहासाठी सिगारेट कंपनीचे एजंट व्हावे लागले. टुरिस्ट गाईड म्हणून काम करायला लागले. पत्नी अंजली यांना खासगी शाळेत शिकवावे लागले. कोणत्याही सरकारी यंत्रणेने त्यांना मदत केली नाही. दत्त यांनी पाटणा येथे बस परमिटसाठी अर्ज केला. तेथे आयुक्तांनी स्वातंत्र्यसैनिक असल्याचा पुरावा मागून त्यांची बदनामी केली.

भगतसिंगांसोबत फाशी न झाल्याने बटुकेश्वर दत्त निराश झाले होते. त्यांना देशासाठी हुतात्मा व्हायचे होते. त्यांनी ही गोष्ट भगतसिंग यांच्यापर्यंत पोहोचवली. तेव्हा भगतसिंगांनी त्यांना पत्र लिहिले की “क्रांतिकारक केवळ त्यांच्या आदर्शांसाठीच मरू शकत नाहीत, तर तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत जगताना सर्व प्रकारचे अत्याचार सहन करू शकतात हे त्यांनी जगाला दाखवून द्यावे.” भगतसिंग यांच्या मातोश्री विद्यावती यांचा बटुकेश्वर यांच्यावरही मोठा प्रभाव होता, ज्यांनी भगतसिंग गेल्यानंतर त्यांचा पुत्र मानला. त्या बटुकेश्वर त्यांच्याकडे सतत येत असे.

महत्वाच्या बातम्या-
सुनावणीदरम्यान बनियानवरच आला होता आरोपी; संतापलेल्या न्यायाधीशांनी दिली ‘ही’ भयंकर शिक्षा
‘शेतकरी अतिरेकी आहेत, तर मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले? शेवटी अहंकार पराभूत झाला’
मोदींच्या निर्णयाला चंद्रकांत पाटलांचा विरोध, म्हणाले कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.