सोने खरेदीची सुवर्णसंधी! होळीच्या आधीच सोनं स्वस्त, जाणून घ्या तोळ्याचा दर

नवी दिल्ली | होळीच्या शुभमुहर्तावर खरेदी करण्यासाठी ग्राहक बाजारात गर्दी करत असतात. कपडे, कार, मोटरसायकल, सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ग्राहकांचा कल असतो. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या बाजारात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये ३०२ रूपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये १,५३३ रूपयांची मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती खाली आल्याने देशातील बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत.

सोने खरेदी करण्याची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. कारण गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी सोन्याचे भाव खूप कमी झाले आहेत. गेल्यावर्षी सोन्याचे भाव ५५,००० च्या वर गेले होते. मात्र यावर्षी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पुण्यामध्ये सोने ४३,९२० रूपये प्रति १० ग्राम आहे. तर नागपुरमध्ये १०  ग्राम सोन्याचा भाव ४४,९१० रूपये आहे.

दरम्यान केंद्र सरकार सोन्या चांदीच्या दागिन्यांवर गोल्ड मोनेटायझेशन योजना आणण्याच्या विचारात आहे. या योजनेमध्ये १० ग्रॅम सोने बॅंकेमध्ये जमा करून त्यावर लोन मिळू शकते. तसेच सोन्यावर व्याजही मिळवून पैसे कमवू शकता.
महत्वाच्या बातम्या-
लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून ‘अशी’ शेती केली सुरु, आता ती करतेय करोडोंची कमाई
ठाकरे सरकारला झटका! आणखी एक बडा पोलिस अधिकारी राज्य सरकारविरोधात हायकोर्टात जाणार
मी नाही सुशांतनेच मला सोडलं, अंकिता लोखंडेने केला सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा
कोरोनाचे नियम पायदळी तुडवत अजितदादांची सभा; आयोजकांविरोधात गुन्हा दाखल

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.