Share

Mumbai : दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; पहा व्हिडीओ

Building

Mumbai : राज्यात सगळीकडे दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. यातच मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. मुंबईतील बोरिवली परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कायक घटना घडली आहे.

बोरिवलीतील साईबाबा नगरमधील गीतांजली नावाची ही इमारत आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही इमारत कोसळली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांचे बचावकार्य सुरु आहे. इमारत कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

या अपघातामध्ये शेजारच्या फुटपाथावर राहणारे काही व्यक्ती देखील जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. तर काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे बोलले जात आहे. ही इमारत ३५ वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या इमारतीला मनपाकडून धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले होती. तसेच पालिकेकडून इमारतीतील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले होते. पण इमारत कोसळली तेव्हा एक पंजाबी कुटुंब इमारतीतच उपस्थित होते. या कुटुंबातीलच ५ ते ६ लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडियावर इमारत कोसळतानाचा एक व्हिडीओ आला आहे. ही इमारत पत्त्यासारखी अगदी क्षणार्धात कोसळली आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना अचानक हा अपघात घडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : गोट्या खेळणाऱ्या मुलांनाही सरकारी नोकरीत आरक्षण? सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस
Shah Rukh Khan: प्रेक्षकांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकल्यावर बॉलिवूडला आली अक्कल, दिग्दर्शक म्हणाला, जास्त गर्व…
NV Ramana: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रमण्णा निवृतीवेळी करणार मोठा खुलासा; स्वतःच केली मोठी घोषणा
Uttar Pradesh: हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाने केले अपहरण, तपासात समोर आले धक्कादायक सत्य

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now