अग्निशामक दलाच्या जवानाचा झाला होता मृत्यू; केजरीवाल यांनी कुटुंबाला केली १ कोटींची मदत

 

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आग विझवताना मृत्यू झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानाच्या कुटुंबियांना बुधवारी एक कोटी रुपयांची मदत केली आहे.

२ जानेवारी २०२० रोजी पीरागढी येथे एका बॅट्री बनवणाऱ्या कारखान्यामध्ये आग लागली होती. या आगीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवताना अमित कुमार बालियान या जवानाचा मृत्यू झाला होता.

तसेच अमितचे लग्न होऊन एक वर्षही झाले नव्हते. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्याचे लग्न झाले होते. लग्न होऊन अवघ्या ११ महिन्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

अमितच्या कुटुंबामध्ये त्याचे आई-वडील, छोटा भाऊ आणि दोन छोट्या बहिणी आहे. केजरीवाल सरकारने केलेल्या या आर्थिक मदतीमुळे त्यांच्यावरचा आर्थिक भार कमी होणार आहे.

अमित कुमार बलियान यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र लोकांचा जीव वाचवताना अमित यांनी स्वत:चे प्राण गमावले.

अमित यांचे संपूर्ण देश आणि दिल्ली शहरावर ऋण आहे. त्यांच्या निधनामुळे आम्हा सर्वांना दु:ख झाले आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.