Share

Farmer : मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर बोलत होते, तेवढ्यात शेतकऱ्याने मंत्रालयाबाहेर स्वत:ला घेतले पेटवून

Eknath Shinde

Farmer : अधिवेशन सुरु असताना एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या बाहेर स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंगावर पेट्रोल ओतून त्याने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनतर त्याला तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

बुधवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यात विविध मुद्द्यांवर चर्चा होत आहेत. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलत होते. त्याचवेळी मंत्रालयाबाहेर एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

सुभाष भानुदास देशमुख असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी उस्मनाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचा रहिवासी आहे. त्याने अंगावर पेट्रोल ओतून आज दुपारी मंत्रालयाबाहेर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे दिसताच तिथे उपस्थित असलेले पोलीस त्याच्याकडे धावून गेले. त्यांनी शेतकऱ्याच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. तसेच त्याला तात्काळ जीटी रुग्णालयात दाखल केले.

शेतकऱ्याने बजाज भवन जवळ फुटपाथवरील झाडाखाली आडोशाला उषा मेहता चौक याठिकाणी अंगावर पेट्रोल घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणेच्या मदतीने जीटी हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयात शेतकऱ्यावर उपचार सुरु आहेत.

सुभाष देशमुख या शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याचा हात भाजला. त्याला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या
BJP : भाजपला चूक कळाली! येत्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन महिलांना संधी, ‘ही’ नावे आघाडीवर
Yuzvendra Chahal: युझवेंद्र आणि धनश्रीचा वाद ज्या पार्टीपासून सुरू झाला ती पार्टी कोणी दिली? अखेर झाला खुलासा
Zarkhand : पोलिसांची वर्दी घालून ट्रकचालकांना लुबाडणाऱ्या अभिनेत्रीचा पर्दाफाश, ‘असा’ रचला होता प्लॅन
Sonam Kapoor baby PHOTO: सोनम कपूरच्या गोंडस बाळाचा फोटो आला समोर, चाहत्यांनी पाडला शुभेच्छांचा वर्षाव

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now