Homeइतरएका कुटुंबाला 22 वर्षांनंतर सापडले चोरीचे सोने, त्याची आजची किंमत ऐकून तुमचे...

एका कुटुंबाला 22 वर्षांनंतर सापडले चोरीचे सोने, त्याची आजची किंमत ऐकून तुमचे देखील डोळे फिरतील…

कोणाचे भाग्य कधी बदलेल सांगता येत नाही. कोणत्याही गोष्टीचा व्यवस्थित वेळ, काळ असतो असे म्हणतात. तसाच काहीसा प्रकार एका कुटूंबासोबत घडला आहे. तब्बल 22 वर्षांपूर्वी चोरीला गेलेलं सोनं त्यांना आता मिळाले. या सोन्याची आजची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

मुंबईत राहणाऱ्या एका कुटुंबाचे 22 वर्षांपूर्वी सोने चोरीला गेले होते, त्यांना ते आता मिळाले. विशेष म्हणजे या वीस वर्षांत या सोन्याची किंमत आठ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. सोने चोरणाऱ्या चोरट्यांनी हे सोने कुटुंबाला परत केले का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तसे नाही. तेव्हाच चोरट्यांकडून हे सोने पोलिसांनी जप्त केले होते, मात्र कायदेशीर गुंतागुंतीमुळे हे सोने कुटुंबीयांना मिळू शकले नाही. आता न्यायालयाने या प्रकरणावर अंतिम निकाल दिला आहे.

‘चरघ दिन’ या फॅशन ब्रँडचे नाव तुम्ही ऐकले असेलच. चराघ दिन हे फॅशन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. हे सोने या कंपनीच्या मालकाचे होते. सत्र न्यायाधीश यु.जे.मोरे यांनी 5 जानेवारी रोजी सोने मूळ मालकांना परत करण्याचा निकाल दिला होता. तिजोरीत राणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेले सोन्याचे नाणे, दोन सोन्याच्या बांगड्या आणि 1,300 ग्रॅम आणि 200 मिलिग्रॅम वजनाच्या दोन पिशव्या होत्या, ज्याची एकूण किंमत 22 वर्षांपूर्वी केवळ13 लाख रुपये होती, जी आता 8 कोटी रुपये झाली आहे.

‘चराघ दिन’ कंपनीचे संस्थापक अर्जुन दासवानी यांचा मुलगा राजू दासवानी यांच्याकडे संपूर्ण सोने सुपूर्द करण्यात आले. सरकारी वकील इक्बाल सोलकर आणि कुलाबा पोलिस निरीक्षक संजय डोनर यांनी सांगितले की, त्यांना काही अटींच्या अधीन राहून मालमत्ता परत करण्यास हरकत नाही. राजू दासवानी यांनी या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर केली, ज्याच्या आधारे हे सोने त्यांचेच असल्याची पुष्टी झाली.

ही मालमत्ता पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात काही अर्थ नाही, असे न्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटले आहे.19 वर्षांहून अधिक काळ लोटला. एवढ्या वर्षात दोन फरार आरोपींच्या अटकेत कोणतीही प्रगती झालेली नाही. तक्रारदार आपली मालमत्ता परत मिळण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत राहिल्यास ती न्यायाची थट्टा आणि कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग ठरेल. त्यामुळे सुंदरबाई अंबाला देसाई यांच्या बाबतीत विहित केलेले प्रमाण लक्षात घेऊन, अर्जदाराला अर्जात दावा केलेल्या सर्व मालमत्तेचा परतावा मिळण्याचा हक्क आहे.

8 मे 1998 रोजी काही सशस्त्र दरोडेखोरांनी अर्जुन दासवानी यांच्या घरात घुसून सर्व सोने लुटून पळ काढला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून हे सोने जप्त केले होते. या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्याचवेळी अर्जन दासवानी यांचे 2007 मध्ये निधन झाले.

महत्वाच्या बातम्या
भरमसाठ होमलोन घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे फायद्याचे; हप्त्याच्या पैशात येतील 2-3 घरे
मराठी अभिनेत्याला काढले मालिकेतून बाहेर; राजकीय भूमिका घेणे पडले महागात…
धनीराम बरुआ: २५ वर्षांपुर्वी या भारतीयाने डुकराचे ह्रदय माणसाला लावलं होतं, पुढे घडला होता ‘हा’ प्रकार