Share

Jalna city : प्रतीक्षा सारखी कोणाशी फोनवर बोलते? सासूने पकडलं, मग सुनेने काढला काटा; जालन्यातील तरुणी कशी अडकली?

Jalna city : जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनीत एका सुनेने सासूचा १९ वेळा वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जालना शहरासह राज्यभरात खळबळ माजली आहे. सहा महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या प्रतीक्षा शिनगारे हिने आपल्या सासू सविता शिनगारे यांचा धारदार शस्त्राने खून केला.

कसा घडला हा थरारक प्रकार?

आकाश शिनगारे आणि प्रतीक्षा यांचा विवाह अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर आकाश आपल्या आईसोबत पत्नीला घेऊन राहू लागला. आकाश नोकरीसाठी बाहेरगावी गेला की, घरात सून आणि सासूच असायच्या. मात्र काही दिवसांपासून सासू-सुनेमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी सकाळी दोघींमध्ये जोरदार वाद झाला आणि प्रतीक्षाने रागाच्या भरात सासूवर धारदार शस्त्राने सपासप १९ वार केले. विशेषतः मानेवर गंभीर जखमा झाल्याने सविता शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला.

खून लपवण्याचा प्रयत्न, पण…

सासूचा खून केल्यानंतर प्रतीक्षाने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. तिने सासूचा मृतदेह एका गोणीत भरला आणि तो घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र घरमालकाने संशयित हालचाली पाहून पोलिसांना खबर दिली. त्यामुळे घाबरून ती तिथून फरार झाली आणि थेट परभणीला आपल्या माहेरी पळून गेली.

मुलाने पाहिला मृतदेह, आक्रोशाने हादरला परिसर

आईचा मृतदेह पाहताच आकाश शिनगारे याने हंबरडा फोडला. “माझ्या आईला का मारलं? जर काही पटत नव्हतं, तर मला का नाही संपवलं?” असे म्हणत तो रडू लागला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.

पोलिसांचा झपाट्याने तपास, आरोपी सून अटकेत

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि प्रतीक्षा शिनगारे परभणीत असल्याचा सुगावा लागला. काही तासांतच परभणी पोलिसांच्या मदतीने तिला अटक करण्यात आली.

सध्या जालना पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, हत्येच्या मूळ कारणांचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now