Share

पोलिसच निघाले वैरी, दलित व्यक्तीला खोट्या प्रकरणात अडकवत बळकावले त्याचे घर

कानपूरमध्ये एका दलित व्यक्तीला खोट्या खटल्यात अडकवल्याप्रकरणी 14 आरोपी पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपी पोलिसांच्या विभागीय चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. याशिवाय कानपूरमधील बारा(Bara) पोलिस स्टेशनचे एसएचओ दीनानाथ मिश्रा आणि गोविंद नगरचे एसीपी विकास पांडे यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे.(A Dalit man was caught in a false case and his house was seized)

या प्रकरणात आरोपींवर कानपूरचे पोलीस आयुक्त विजय सिंह मीना यांनी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या यादव मार्केट चौकी भागात राहणाऱ्या महादेवने उमराव नावाच्या व्यक्तीसोबत ३५ लाख रुपयांना आपल्या घराचा करार निश्चित केला होता. उमराव यांनी १० लाख रुपये देऊन घराची नोंदणी करून घेतली.

पण महादेव यांनी वारंवार विनंती करूनही उमराव यांनी पूर्ण रक्कम दिली नाही. त्यामुळे महादेवने उमराव यांना घराचा ताबा दिला नाही. १५ जानेवारी २०२२ रोजी उमराव आणि त्यांचे काही साथीदार छतावरून त्यांच्या घरात घुसले आणि संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केली. यादरम्यान महादेव यांच्या मुलीच्या डोक्याला देखील दुखापत झाली होती.

उमराव आणि त्याच्या साथीदारांनी महादेव यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल देखील लुटले. या प्रकरणी महादेवने उमराव आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध बारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी या प्रकरणी उमराववर कोणतीही कारवाई केली नाही. उलट २३ फेब्रुवारी रोजी उमरावने जबरदस्तीने महादेवच्या घरावर ताबा मिळवला. यावेळी पोलिसांनी उमरावला मदत केली होती.

या प्रकरणावर गदारोळ झाल्यानंतर त्याचा तपास कानपूरच्या दक्षिण एडीसीपी मनीष सोनकर यांच्याकडे सोपवण्यात आला. मनीष सोनकर यांनी केलेल्या तपासात उमरावला महादेवच्या घरावर ताबा मिळवण्यात एसीपी विकास पांडे, बारा एसएचओ दीनानाथ मिश्रा आणि यादव मार्केट चौकीचे प्रभारी आशिष कुमार मिश्रा यांनी मदत केल्याचे समोर आले आहे.

मनीष सोनकर यांच्या तपास अहवालानुसार, महादेव यांच्यावर एसी/एसटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे बाराचे ठाणेदार दीनानाथ मिश्रा यांनी त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवायला हवा होता. परंतु आरोपीला पाठीशी घालत त्यांनी पोलीस स्टेशन स्तरावरच हे प्रकरण दडपले. या प्रकरणात सर्व आरोपी पोलिसांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मनीष सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीपी पांडे आणि बारा पोलिस स्टेशनचे एसएचओ यांच्या मदतीने उमराव यांनी महादेवच्या घरावर कब्जा केला. त्यामुळे त्याचे कुटुंब रस्त्यावर आले. पण या सर्व प्रकारानंतरही पोलिसांनी असंवेदनशीलता दाखवत महादेववरच चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात १४ आरोपी पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
ब्रह्मोस मिसाईल पाकिस्तानात कोणाच्या चुकांमुळे पडले? आयएएफच्या तपासात झाले उघड
आपल्या ८ महिन्यांच्या बाळावर अंत्यसंस्कार करून त्याच संध्याकाळी ‘या’ चित्रपटाच्या शुटींगसाठी पोहोचली होती सरोज खान
बॉक्स ऑफिसवर ‘द काश्मीर फाइल्स’ला सलग दुसरा धक्का; मंगळवारी केली फक्त ‘एवढी’ कमाई

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now