अश्वगंधा एक गुणकारी औषधी आयुर्वेदिक वनस्पती आहे यामुळे ही खुप उपयोगी आहे. अश्वगंधामुळे अनेक आजार ठीक करण्यासाठी मदत होते. अश्वगंधा एक बलवर्धक रसायन मानले जाते.
प्राचीन काळापासून शरीरातील शक्तिवर्धक, पौष्टिक व सर्वांग शक्ती देणारा, क्षय रोगनाशक, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारा, वृधावस्थेला जास्त काळासाठी दूर ठेवण्यासाठी अश्वगंधाचा वापर होतो. पण यासोबतच कोरोनाशी लढण्यासाठी अश्वगंधा उपयोगी पडतो.
कोरोना विषाणूच्या महासाथीत फक्त अॅलोपेथीच नाही तर आयुर्वेदही उपयोगात येऊ शकते. आयआयटी दिल्ली आणि जपानच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एडवांस्ड इंडस्ट्रियल साइन्स अँड टेक्नोलॉजीच्या संशोधनानुसार, अश्वगंधामध्ये काही अशा नैसर्गिक गोष्टी आहेत की ज्या कोविड-19 आजारापासून वाचवू शकतात.
अश्वगंधा शरीराला हानी होण्यापासून वाचवू शकते तसंच यातील अँटीऑक्सिडंट आजाराचा सामना करण्यास मदत करते.
तणाव कमी करण्यात मदत करते: अश्वगंधा तणाव कमी करण्यात खूप मदत करते. या औषधाच्या वैद्यकीय परीक्षणामध्ये असेही दिसून आले की ज्यांना तणावाची समस्या होती, त्यांचा तणाव कमी करण्यात ते खूप लाभदायक ठरेले.
आजारांशी लढण्याची शक्ती वाढवते: अश्वगंधामध्ये अशी काही तत्वे आहेत ज्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. म्हणजेच आजारांशी लढण्यासाठी ताकद मिळते. अशाप्रकारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अश्वगंधा कोरोनासारख्या महामारीला हरवायला मदतच करते. यावर अजून संशोधन सुरू आहे.
पण अश्वगंधाच्या वैद्यकीय परीक्षणातून हे सिद्ध झाले आहे की अनेक लोकांना यापासून फायदाच झाला आहे. तेव्हा निश्चितच अश्वगंधापासून कोरोनाची लस विकसित केली जाऊ शकते.
अश्वगंधा रक्तशर्करा कमी करण्यात मदत करते. त्याने शरीरातील इन्सुलिनच्या पातळीत सुधारणा होते. म्हणून मधुमेही लोकांनी अश्वगंधाचे सेवन जरूर करायला हवे, त्याने मधुमेह नियंत्रणात आणायला मदत होते.
महिलांना श्वेतप्रदाराचा त्रास होतो त्याने शरीर कमजोर होते, त्याचा परिणाम गर्भाशयावर होतो. अशा महिलांनी अश्वगंधा घेतल्यास त्यांना फायदा होतो. महिलांशी संबंधित अन्य आजारांवरही अश्वगंधा उपयुक्त आहे. गर्भवती महिलांनी अश्वगंधा घेऊ नये.
तसेच अश्वगंधाने सूज आणि जळजळ या समस्यापण ठीक होतात. अश्वगंधामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे रोगप्रतिकारक पेशी वाढवतात आणि अनेक रोगांपासून बचाव करतात.
अश्वगंधा डोळ्यांची नजर चांगली करते. रोज एक ग्लास दुधासोबत अश्वगंधा घेतले तर नजर चांगली होते आणि चष्म्याचा नंबरही कमी होतो.
डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्वगंधाचा वापर करा.