Share

Shivsena : शिंदेंनी शिवसेना फोडली, आता शिवसेनेने काॅंग्रेसला पाडले खिंडार; बड्या नेत्याचा सेनेत प्रवेश

Udhhav Thackeray Rahul Gandhi

Shivsena : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला खिंडार पडले होते. मात्र, आता शिवसेनेत विविध पक्षांचे नेते प्रवेश करत आहेत. आणखी एका नेत्याने शिवबंधन बांधल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे.

आता थेट काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांनीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. औरंगाबाद येथील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन तायडे यांनी यांनी शिवबंधन बांधले आहे.

सचिन तायडे हे गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सचिन तायडे यांना शिवबंधन बांधले आहे. तसेच नुकताच बीड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले सुनील धांडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

त्यामुळे मराठवाड्यात उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. सुनील धांडे यांनी याआधी दोनदा शिवसेना सोडली होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास राहिला आहे. त्यानंतर आता ते परत शिवसेनेत आले आहेत.

आगामी निवणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला आपली ताकद वाढवणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आपली पक्षसंघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात आता या दोन नेत्यांच्या प्रवेशाचा शिवसेनेला फायदाच होणार आहे.

तसेच महाविकास आघाडीने आपली युती कायम ठेवत पुढील निवडणूका सोबत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तायडे हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील एका पक्षातील नेत्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्यात अंतर्गत वाद निर्माण होईल का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या
Foxconn : टक्केवारीची डील झाली नाही म्हणून.., फॉक्सकॉन प्रकल्पावरून संजय शिरसाटांचा मविआवर गंभीर आरोप
Salman khan : सलमानला मारण्यासाठी बनवला होता प्लॅन-बी, फार्म हाऊसच्या मार्गावर भाड्याने घेतली होती रूम, पण…
Vitthal temple : मोठी बातमी! पंढरपुरातील सात मजली दर्शन मंडप पाडणार; जाणून घ्या यामागील कारण
narayan rane : राणे व त्यांच्या दोन मुलांनी बॉडीगार्डशिवाय महाराष्ट्रात फिरुन दाखवावे; शिवसेनेच्या वाघाचे ओपन चॅलेंज

 

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now