Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांनी लव्ह जिहाद प्रकरणावरून अमरावती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांशी हुज्जत घातली होती. तसेच पोलिसांनी त्यांचा फोन रेकॉर्ड केला असल्याची तक्रार करत त्यांनी एका पोलिसाला प्रचंड झापले होते.
एका मुस्लिम मुलाने एका हिंदू मुलीला पळवून नेले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, संबंधित मुलीचा शोध लागल्यानंतर तिने आपण स्वतःच्या वैयक्तिक कारणामुळे घर सोडून गेलो असल्याचा खुलासा केला. तसेच नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली असा आरोपही केला.
त्या मुलीच्या या वक्तव्यानंतर नवनीत राणांनी हुज्जत घातलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीनेही त्यांना चांगलेच सुनावले होते. पोलिसांचा एवढा राग येत असेल तर आधी पोलिसांची सुरक्षा काढून टाका असे त्यांनी राणांना म्हटले होते. हे सर्व प्रकरण आता नवनीत राणांच्या चांगलेच अंगाशी आले आहे.
अकोला येथिल जावेद झकेरिया यांनी नवनीत राणांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. जावेद झकेरिया आपल्या तक्रारीमध्ये म्हणाले की, मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असून एक बातमी ७ सप्टेंबरला सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. यात खासदार नवनीत राणा या सतत लव्ह जिहादचा उल्लेख करत पोलीस अधिकाऱ्यांवर ओरडत होत्या.
हे प्रकरण एका बेपत्ता मुलीशी संबंधित होते. मात्र, नवनीत राणांनी त्या मुलीला अन्य धर्माच्या मुलाने पळवून नेले असल्याचा आरोप केला होता. त्यांनी हे सगळं दोन धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने केले. तसेच नवनीत राणा पोलिसांवर संबंधित मुस्लिम मुलावर कारवाई करण्यासाठी दबावही आणत होत्या.
ही बातमी सोशल मीडियाद्वारे सगळीकडे पसरली होती. नवनीत राणांच्या या कृत्याचे पडसाद नक्कीच उमटतील. त्यासाठी ही तक्रार दाखल करण्यात येत असल्याचे जावेद झकेरिया यावेळी म्हणाले. यासोबतच हिंदू मुली मुस्लिम मुलासोबत पळून गेल्याच्या घटना सर्वत्र घडतच असतात. मात्र, नवनीत राणा अशा खोट्या बातम्या पसरवून स्वतःच्या फायदयासाठी शांतता भंग करण्याचे काम करत असल्याचेही ते म्हणाले.
तसेच जावेद झकेरिया यांनी खासदार नवनीत राणा यांचे कृत्य हे स्पष्टपणे दोन धर्म आणि समुदायांमध्ये वैर निर्माण करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यासोबतच अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भीम आर्मीच्यावतीने काल मोर्चा काढण्यात आला होता.
विविध कलमांनुसार खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर आता अकोला येथे ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
VIDEO : Amisha Patel : वयाच्या ४६ व्या वर्षीही अमिषा पटेलने ओलांडल्या सर्व मर्यादा, टू पिस घालून व्हिडीओ केला शेअर
Uttar Pradesh : मेहुणीसोबत मिळून दाजी बाईकवर बसून करायचा ‘असं’ काम, सीसीटीव्ही पाहून पोलिसही हैराण
डॉक्टरांकडून मृत घोषित, पत्नीने पतीच्या हाताला स्पर्श करताच हृदयाची धडधड सुरू; वाचा नेमकं काय घडलं?
भाजपचा बडा नेता पवारांच्या भेटीसाठी थेट ‘सिल्व्हर ओक’वर; वाचा नेमकं बंद दाराआडं काय घडलं?