Vikram Gokhale death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच पुण्यातील रुग्णालयात निधन झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ते ॲडमीट होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर चित्रपट सृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. समाज माध्यमांवर अनेक कालाकारांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहीली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर हा दुर्मिळ आजार झाल्यामुळे उपचारासाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पण याच दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील डोंगरगाव येथील जमिनीच्या वादात त्यांचे नाव आले होते. जाणून घेऊयात नेमका काय होता तो किस्सा..
मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील जमिनीची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा विक्री केल्याप्रकरणी विक्रम गोखले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर १४ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला होता. त्यात रामभाऊ म्हाळगी यांचे चिरंजीव जयंत म्हाळगी तसेच त्यांच्या पत्नीचाही समावेश होता.
जयंत प्रभाकर बहिरट यांनी विक्रम गोखले यांच्यावर आणि रामभाऊ म्हाळगी यांचा मुलगा जयंत म्हाळगी यांच्यावर आरोप केला होता की, विक्रम गोखले यांच्यासह रामभाऊ म्हाळगी यांचे चिरंजीव जयंत म्हाळगी या तिघांनी 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
त्यानुसार पुण्यातील पौड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकूण ९६ लाख ९९ हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या सगळ्यांवर कलम ४२०, ४६५, ४६८, ३४१, ४४८, ४२७, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विक्रम गोखले हे गिरीवन प्रोजेक्टचे अध्यक्ष आहेत. जयंत म्हाळगी आणि सुजाता म्हाळगी यांनी या कंपनीची स्थापना केली होती. प्रोजेक्ट सरकारमान्य असल्याचा दावा करुन त्यांनी खोटे आश्वासन देऊन प्लॉटधारकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. प्लॉटधारकांना फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
खरेदीखतात दिलेल्या गटापेक्षा दीड किमी लांब पझेशन दिले. तसेच खरेदी खरेदीखतात दिलेला गट आणि पझेशन दिलेला गट सारखा नाही. काहींना आजपर्यंत पझेशन मिळाले नाही. पैसे घेऊन योग्य ते क्षेत्र दिले नाही, खरेदी केलेल्या प्लॉटवर जाऊ दिले नाही. असे सर्व आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते. या सर्व आरोपांचे पुढे काय झाले याबाबतची ताजी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
विक्रम गोखले यांनी १९७ साली वयाच्या २६व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट बॉलिवूड सम्राट अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता, ज्याचे नाव होते परवाना. विक्रम गोखले हे ‘हम दिल दे चुके सनम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी ओळखले जातात. या चित्रपटात त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
विक्रम गोखले यांना २०१० मध्ये मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र आहेत.
महत्वाच्या बातम्या
सतत फ्लॉप रिषभ पंतला पुन्हा संधी, मात्र चांगल्या धावा करूनही संजू सॅमसनला ठेवले संघाबाहेर
जखमी सैनिकांना मदत अन् वृद्ध कलावंतांसाठी दिली करोडोंची जागा; वाचा विक्रम गोखलेंची दुसरी बाजू
ajay devgan : दृश्यम २ च्या छप्पर फाड कमाईनंतर अजय पोहचला काशी विश्वनाथ मंदिरात; म्हणाला, हर हर महादेव