समृद्ध आणि सामर्थ्यवान असूनही, आपल्यापैकी बहुतेक लोक सामूहिक समस्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न किंवा सरकारी यंत्रणांकडे प्रतीक्षा करत पाहत राहतात; आणि या प्रतिक्षेत समस्या वाढतच जातात. पण, काही कर्तृत्ववान माणसे अशीही असतात; सामुहिक समस्याही वैयक्तिक प्रयत्नातून दूर करण्याची जिद्द त्यांच्यात असते.
असेच काहीसे चित्र बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातून समोर आले आहे. मधुबनी जिल्ह्यातील कलुही ब्लॉकच्या नरार पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये गावच्या रस्त्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात गावकऱ्यांना गावाबाहेर पडणे कठीण झाले होते.
मात्र ही समस्या वैयक्तिक पातळीवर घेऊन एका ग्रामस्थांनी फक्त निवारण केले नाही तर; उलट 5 लाख खर्चून पूल बांधला. ग्रामस्थांच्या समस्या पाहून महादेव झा नावाच्या वृद्धाने वैयक्तिक प्रयत्नातून ही समस्या सोडविण्याचे स्वप्न बाळगले होते.
समाजाला एक नवा मार्ग दाखवत त्यांनी पत्नी आणि मुलगा सुधीर झा यांना सांगितले की – “मृत्यूनंतर श्राद्धभोज आणि विधींवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा गावाच्या रस्त्यावर पूल बांधा”. त्यामुळे, सुधीर झा यांनी आपल्या दिवंगत वडिलांचे स्वप्न साकार करून गावाच्या रस्त्यावर 5 लाख रुपये खर्चून पूल बांधला आहे.
दिवंगत महादेव झा यांच्या पत्नी माहेश्वरी देवी सांगतात की, पेशाने शिक्षक असलेले त्यांचे पती महादेव झा यांचे 2020 मध्ये निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी श्राद्धाच्या मेजवानीवर खर्च न करता गावाच्या रस्त्यावर पूल बांधून घेतला आहे.
दिवंगत महादेव झा यांचे धाकटे बंधू महावीर झा सांगतात की, गावातील रस्त्यावर पूल बांधल्यामुळे ये-जा करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, विशेषत: शेतकर्यांना कंबरभर खोल पाण्यात पोहत त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्याच्या समस्येतून सुटका झाली आहे. स्व.महादेव झा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारी यंत्रणेला शिव्याशाप देण्याऐवजी वैयक्तिक प्रयत्नांनीही समाजाची स्थिती आणि दिशा बदलली जाऊ शकते, हे सत्य सिद्ध केले आहे.
महत्वाच्या बातम्या
त्याने माझे ब्रेस्ट दाबले, पँटमध्ये हात टाकला अन्…; मराठी अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप
लाइव्ह मॅचमध्ये संतप्त भारतीय फलंदाजाने केले ‘असे’ कृत्य, BCCI करू शकते मोठी कारवाई, करिअरला धोका
ऑपरेशन करताना डॉक्टर नेहमी हिरवा पोशाखच का घालतात? जाणून घ्या खरे कारण…