कन्याकुमारी (Kanyakumari): स्केट बोर्डवर निघालेल्या तरुणाला ट्रकने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हा तरुण स्केट बोर्डवर कन्याकुमारीहून काश्मीरला निघाला होता. हरियाणातील पंचकुला येथे काल हा अपघात घडला आहे. या तरुणाचे नाव अनस हजस असे असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर जखमी तरूणाला जवळच्या शासकीय रूग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनस त्याच्या स्केटबोर्डवरून कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करत होता. तेव्हा पंचकुलातील पिंजोरहून हिमाचल प्रदेशातील नालागड येथे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने अनसला धडक दिली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. काही स्थानिक लोकांनी ट्रकचा क्रमांक नोंदवला आहे. त्यानुसार कलम ३०४A आणि २७९ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पिंजोर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी राम करण यांनी सांगितल्यानुसार, शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.
अनस हा केरळमधील तिरुवनंतपुरममधील वेंजारामूडू येथील रहिवासी होता. ३१ वर्षीय अनसने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतल्यानंतर तिरुअनंतपुरममधील टेक्नोपार्क येथील आयटी फर्ममध्ये प्रवेश घेतला. त्याच्या आईचे नाव शैला बीवी असे असून वडील अलियारकुंजी सौदी अरेबियात काम करतात.
स्केटिंगबाबत जनजागृती व्हावी याकरिता अनसने ही मोहीम सुरू केली होती. त्यासाठी त्याने तीन वर्षांपूर्वी स्केटिंग बोर्ड विकत घेऊन प्रशिक्षणही सुरू केले होते. कन्याकुमारी-काश्मीर हा प्रवास पूर्ण केल्यानंतर त्याने स्केटबोर्डवर भूतान, नेपाळ आणि कंबोडियाला जाण्याचा बेत आखला होता. अनसने हा प्रवास सुरू करण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना याबाबत माहितीदेखील दिली होती.
अनसने २९ मे रोजी कन्याकुमारी ते काश्मीर हा प्रवास सुरु केला होता. ३५११ किमीच्या या प्रवासानंतर ३० जुलै रोजी तो हरियाणा-पंजाब सीमेवर पोहोचला. त्यावेळी त्याने आपल्या प्रवासाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आपले अपडेट दिले होते. त्यात “मी काश्मीरपासून फक्त ६०० किमी दूर आहे. काश्मीरमध्ये पोहोचण्यासाठी आणखी 15 दिवस लागू शकतात. मी दिवसाला फक्त ४० ते ५० किमी स्केटिंग करत असल्याचे नमुद केले होते. आतापर्यंत सर्व काही सुरक्षित असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले होते.
महत्वाच्या बातम्या
kangna ranaut: …म्हणून आमीर खानने स्वताच ‘हा’ वाद सुरू केला, कंगना राणावतचा आमिर खानवर गंभीर आरोप
Uday Samant: उदय सामंत हल्ल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवरही पोलीस कारवाई करणार? शिंदे गटातील बड्या नेत्याचे संकेत
MNS: आता मनसेही मुख्यमंत्री शिंदेंविरोधात उतरली रणांगणात; म्हणाली, ‘शिंदे गटाचं अस्तित्व फक्त…
Shivsena: शिवसेनेची ताकद प्रचंड वाढणार, राज्यातील मोठा ओबीसी नेता करणार शिवसेनेत प्रवेश