Aurangabad : सोशल मीडियावर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकजण त्या वस्तू घरी बनवूनही बघत असतात. अशाच एका तरुणाने चक्क घरी हेलिकॉप्टर तयार केले आहे. विशेषतः हे हेलिकॉप्टर त्याने टाकाऊ वस्तूंपासून बनवले आहे.
औरंगाबाद येथील आयटीआय शिकत असलेल्या एका तरुणाने विविध वस्तू वापरून हेलिकॉप्टर तयार केले आहे. सतीश मुंडे असे या तरुणाचे नाव आहे. सतीशने जुन्या कारच्या उरलेल्या साहित्यांपासून हेलिकॉप्टर बनवले आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याने एका कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तीन वर्षे नोकरी केल्यानंतर लॉकडाऊनमुळे त्याला त्याची नोकरी गमवावी लागली. त्यानंतर त्याने युट्युबवर व्हिडीओ पाहून हेलिकॉप्टर तयार करण्याचे ठरवले.
या कारमध्ये त्याने मारुती कारचे इंजिन आणि गिअर बॉक्स, स्कुटीचे पेट्रोल टॅंक आणि हेलिकॉप्टरच्या टेल रोटरसाठी त्याने स्प्लेंडरची चैन बसवली आहे. त्याने हेलिकॉप्टर तयार झाल्यानंतर त्याची टेस्ट घेतली. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न केल्याने हे हेलिकॉप्टर उडाले नाही.
सतीशला हे हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी जवळपास दोन ते अडीच लाखांचा खर्च लागला आहे. हेलिकॉप्टरच्या उरलेल्या कामासाठी त्याला आणखी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सतीशने केलेले हे काम सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे.
सतीशला सुरुवातीपासूनच हेलिकॉप्टर तयार करण्याची ईच्छा होती. त्याने त्याची ही ईच्छा पूर्ण केली आहे. मुख्य म्हणजे सतीशने स्वतः पैसे कमावून त्याची ही ईच्छा पूर्ण केली आहे. सतीशच्या या प्रयोगामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!